मैदानावर चरणाऱ्या तीनही म्हशी चोरट्यांनी केल्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:51 PM2018-08-30T22:51:40+5:302018-08-30T22:52:01+5:30

दुपारी तीन वाजेच्या सुमारास संध्याकाळी पुन्हा मैदानावर पोहचल्यानंतर तेथून म्हशी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ परिसरात विचारपूस सुरू करत आजूबाजूच्या गोठ्यांमध्ये तपास केला परंतु म्हशींचा शोध लागला नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Three thieves roaming on the field after being stolen | मैदानावर चरणाऱ्या तीनही म्हशी चोरट्यांनी केल्या गायब

मैदानावर चरणाऱ्या तीनही म्हशी चोरट्यांनी केल्या गायब

Next
ठळक मुद्देतीन म्हशी पोलिसांनी पुन्हा मिळविल्या आहेत.

नाशिक : येथील सदिच्छानगर मैदानातून अज्ञात संशियतांनी तीन म्हशी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी गणेश जे. पांजगे (२५, रा. चेतना नगर) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. गणेश यांनी शुक्रवारी (दि.२४) सदिच्छानगर येथील मैदानावर १ लाख८० हजार रुपये किमतीच्या तीन म्हशी चरण्यासाठी सोडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन म्हैस एक रेडा व चाळीस शेळ्या आहेत. त्यांचा सांभाळ आई वडील करीत असून दररोज वडील जनावरांना चरण्यासाठी मैदानावर घेऊन जातात असे फिर्यादीत म्हटले आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी तीन म्हशी व शेळ्या चरण्यासाठी मैदानावर घेऊन गेले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास संध्याकाळी पुन्हा मैदानावर पोहचल्यानंतर तेथून म्हशी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ परिसरात विचारपूस सुरू करत आजूबाजूच्या गोठ्यांमध्ये तपास केला परंतु म्हशींचा शोध लागला नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे व पोलीस निरीक्षक सी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू क रण्यात आला. गुन्हे शोध पथकाचे रियाज शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशियत आरोपी विश्वास शिंदे, विकास कोकणे, कैलास देहाडे, पोपट देडे यांना सापळा रचून पथकाने ताब्यात घेत ‘खाकी’ स्टाइलने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या तीन म्हशी पोलिसांनी पुन्हा मिळविल्या आहेत.

Web Title: Three thieves roaming on the field after being stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.