विद्यार्थ्यांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:29 AM2017-08-23T00:29:51+5:302017-08-23T00:29:57+5:30

सायंकाळी शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर घरी परतणाºया विद्यार्थ्यांना बसच मिळत नसल्याने निमाणी स्थानकावर जमलेल्या विद्यार्थ्यांनी थेट पंचवटी डेपो गाठून प्रशासनाला धारेवर धरले. काही संतप्त विद्यार्थ्यांनी बसेसच्या काचाही फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

 Troubles from students | विद्यार्थ्यांकडून तोडफोड

विद्यार्थ्यांकडून तोडफोड

Next

नाशिक : सायंकाळी शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर घरी परतणाºया विद्यार्थ्यांना बसच मिळत नसल्याने निमाणी स्थानकावर जमलेल्या विद्यार्थ्यांनी थेट पंचवटी डेपो गाठून प्रशासनाला धारेवर धरले. काही संतप्त विद्यार्थ्यांनी बसेसच्या काचाही फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नियमित बसने ये-जा करणाºया पासधारक विद्यार्थ्यांना सायंकाळी बसच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बसेस बंद करण्यापूर्वी शाळा-महाविद्यालयांना माहिती का देण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तासन्तास प्रतीक्षा करूनही मंगळवारी शहरातील बसथांब्यांवर बसेस येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जुना आडगाव नाका परिसरात बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या खिडक्या फुटल्याने चालकाने बस (एम.एच.१५ अ‍ेके ८०५६) आगार क्रमांक २मध्ये दाखल केली. रात्रीपर्यंत बससेवेबाबत कुठलाही तोडगा प्रशासनाला काढता आला नाही. यामुळे दुपारपासून रात्रीपर्यंत शहर बससेवा पूर्ववत होऊ शकली नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांना बसेस मिळत नसल्याने पालकवर्गाची धावपळ उडाली.

Web Title:  Troubles from students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.