आजपासून दोनदिवसीय राज्यस्तरीय कॅन्सर परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:01 AM2018-08-11T02:01:09+5:302018-08-11T02:01:28+5:30
नाशिक : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर विविध उपचार पद्धती उपलब्ध असताना या उपचार करण्याच्या पद्धतीतील मेडिकल आँकॉलॉजीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती महाराष्ट्रातील विविध कॅन्सरतज्ज्ञांना व्हावी या उद्देशाने नाशिकमध्ये चौथ्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आँकॉलॉजिस्टतर्फे शनिवारी (दि. ११) आणि रविवारी (दि. १२) दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नाशिक : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर विविध उपचार पद्धती उपलब्ध असताना या उपचार करण्याच्या पद्धतीतील मेडिकल आँकॉलॉजीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती महाराष्ट्रातील विविध कॅन्सरतज्ज्ञांना व्हावी या उद्देशाने नाशिकमध्ये चौथ्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आँकॉलॉजिस्टतर्फे शनिवारी (दि. ११) आणि रविवारी (दि. १२) दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी डॉ. भूषण नेमाडे, डॉ. सुलभ भांबरे, डॉ. नागेश मदणूरकर, डॉ. संजय अहिरे आणि सहकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वच भागातून कॅन्सर तज्ज्ञांना अर्थात आँकॉलॉजिस्ट परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत त्यांना एकाचवेळी या उपचार पद्धतीतील अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळावी हा मुख्य हेतू असणार आहे. सर्वच रु ग्णांना विविध शहरात एकाच उपचारपद्धतीने उपचार व्हावेत, त्यांना उपचारासाठी मोठ्या शहरात हलविण्याची आवश्यकता भासू नये यासाठी कॅन्सर तज्ज्ञांची ही शैक्षणिक परिषद आयोजित केली आहे.