दोन दिवस संप : रविवारपासून बेमुदत बंदचा इशारा कर्मचाऱ्यांच्या संपाने कोषागारचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:47 AM2018-05-04T01:47:52+5:302018-05-04T01:47:52+5:30
नाशिक : कोषागार कार्यालयातील लिपिकांना पदोन्नती देण्यास सरकारने नकार दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा कोषागार कर्मचाºयांनी गुरुवारपासून दोन दिवस सामूहिक रजा टाकून संप पुकारला.
नाशिक : कोषागार कार्यालयातील लिपिकांना पदोन्नती देण्यास सरकारने नकार दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा कोषागार कर्मचाºयांनी गुरुवारपासून दोन दिवस सामूहिक रजा टाकून संप पुकारला असून, जिल्ह्यातील कामकाज ठप्प झाले आहे. शासनाने या संपाची दखल न घेतल्यास रविवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य लेखा व कोषागार कर्मचारी संघटनेने वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोषागार कार्यालयातील कर्मचाºयांच्या सेवा प्रवेश नियमात २००८ पासून बदल करण्यात आले असून, सन २००८ च्या पूर्वीच्या कर्मचाºयांना पदोन्नतीसाठी पूर्वीचेच नियम लागू करून २००८ नंतर नियुक्त कर्मचाºयांना नवीन नियम लागू केलेले आहेत. त्यामुळे कोषागारातील लेखा लिपिक पदोन्नतीपासून वंचित राहात आहेत. फक्त कोकण विभागातील कर्मचाºयांनाच पदोन्नतीचा लाभ मिळत असून, अन्य विभागातील कर्मचाºयांना ७ ते ८ वर्ष पदोन्नतीसाठी वाट पहावी लागणार आहे. कर्मचारी संपावर गेल्याने दिवसभर कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनेचे राज्य सहसचिव राजेश राजवाडे, नाशिकचे अध्यक्ष राठोड, अण्णासाहेब भडांगे, परदेशी, वालझाडे, दवणे, बेलदार, बेंद्रे, गायकर, पवार, गुजर,
जाधव, घोडके, माळी आदींनी केला आहे.