उड्डाणपुलाखालील गजरे विक्र ेत्यांवर मनपा पूर्वविभागाच्या वतीने कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 03:11 PM2017-10-04T15:11:26+5:302017-10-04T15:11:39+5:30
इंदिरानगर - महापालिकेच्या पूर्व विभाग आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्यावतीने पुलाखाली डेरा मांडून बसलेल्या गजरे विक्र ेत्यांवर बुधवारी(दि.४) सकाळी कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्व:स सोडला आहे.
या गजरे विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करुनही परस्थिती जैसै थे च असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल मंगळवारी (दि.३) लोकमतमध्ये ‘उड्डाणपुलाखालील अतिक्रमण जैसे थेच’ या मथळ्याखाली वृत्तही छापले होते. या वृत्ताची दखल घेत आज सकाळी अतिक्र मण मोहिम राबवून कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानक, द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून रस्ते एकत्र येतात. त्यामुळे चौकीवर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्र ेत्यांनी अतिक्र मण केले होते. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला होता. तेथेच अंघोळ,स्वयंपाक, झोप, मलमूत्र विसर्जन आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला होता. मुंबई नाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे पण दुसरीकडे गजरे विक्रेत्यांच्या अतिक्र मणांमुळे शहराचे सौंदर्य बिघडत चालले होते. आज सकाळी मनपाचा पूर्व विभागाने मोठा पोलिस फौजफाटा घेऊन अतिक्र मण मोहीम राबवली तसेच रस्त्यावर गॅरेज धारकांची वाहतुकीस अडथळा ठरणारी चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. यावेळी अतिक्र मण उपायुक्त आर. बहिरम, सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्यासह सर्व विभागाचे विभागीय अधिकारी, कर्मचारी यांनी वाहनांचा आणि पोलिसांचा फौजफाटा घेत अतिक्रमण मोहीम राबवली.