अघोषीत निर्यातबंदीचा फटका ; लासलगावी कांदा भावात ८०० रुपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:29 PM2017-11-28T19:29:04+5:302017-11-28T19:39:22+5:30

अघोषीत निर्यातबंदीचा फटका मंगळवारी लासलगावी लिलावात बसुन लाल कांदा एकाच दिवसात आठशे रूपयांनी घसरला.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या संताप व्यक्त केला जात आहे.

  Unauthorized export bans; Lathagavi onion falls by Rs 800 to Rs | अघोषीत निर्यातबंदीचा फटका ; लासलगावी कांदा भावात ८०० रुपयांची घसरण

अघोषीत निर्यातबंदीचा फटका ; लासलगावी कांदा भावात ८०० रुपयांची घसरण

Next
ठळक मुद्दे कांदा उत्पादकांत संताप घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा फटकालाल कांद्याचे एकरी उत्पादन घटले

लासलगांव : अघोषीत निर्यातबंदीचा फटका मंगळवारी लासलगावी लिलावात बसुन लाल कांदा एकाच दिवसात आठशे रूपयांनी घसरला.त्यामुळे कांदा उत्पादकांत संताप व्यक्त केला जात आहे.  किरकोळ बाजारातील कांद्याचे दर आणखी वाढु नये यासाठी केंद्र शासनाने कांद्यावर ८५० डॉलर प्रती टन इतके किमान निर्यातमुल्य लावल्याने कांदा निर्यातीवर अप्रत्यक्ष बंदी आली असल्याने याचा थेट फटका मंगळवारी कांदा बाजारावर झाले. कालच्या तुलनेने कांद्याच्या दरात तब्बल ८०० रूपयांची घसरण झाली.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा फटका शेतकºयांना बसत आहे. सरासरी ३ हजार  ३००0 रु पये ते ३५०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जाणारा कांदा २७०० रु पये प्रति क्विंटलने विक्र ी झाल्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . आज जरी कांदा भाव वाढलेले दिसत असले तरी लाल कांद्याचे एकरी उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे मिळणाºया भावातून कुठेतरी मेळ बसत आहे. श्हरी भागात कांद्याने ६० रु पये प्रति किलोचा दर ओलांडल्यामुळे केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला त्याचे आज पडसाद कृषी उत्पन्न बाजार समिती दिसून आले.
येथील मुख्य बाजार समितीत लाल कांद्याची १९७० क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला कमीतकमी १५०० सरासरी २७०० जास्तीत जास्त जास्त ३७१५ भाव मिळाला.

Web Title:   Unauthorized export bans; Lathagavi onion falls by Rs 800 to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.