अनधिकृत मोबाइल टॉवरचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:32 AM2018-02-01T00:32:51+5:302018-02-01T00:33:32+5:30
मनपा प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.२९) दुपारी बंद पाडले. या अनधिकृत टॉवरबाबत प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी कळविल्यानंतर सदर टॉवरचे साहित्य मनपाने जप्त केले आहे.
पंचवटी : मनपा प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.२९) दुपारी बंद पाडले. या अनधिकृत टॉवरबाबत प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी कळविल्यानंतर सदर टॉवरचे साहित्य मनपाने जप्त केले आहे. साईनगर येथे काही दिवसांपासून एका खासगी जागेवर मोबाइल टॉवरचे बांधकाम सुरू होते. कामाबाबत नागरिकांनी विचारणा केली असता ड्रेनेज लाईनचे काम सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांना संशय आल्याने काम बंद करण्याचा प्रयत्न केला असता काम करणाºयांनी नागरिकांशी अर्वाच्च भाषा वापरली. त्यानंतर नागरिकांनी पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्याशी संपर्क केला. माने यांनी मोबाइल टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली व स्थानिक नागरिकांना घेऊन पंचवटी पोलिसांत अनधिकृत मोबाइल टॉवर न होण्याबाबत अर्ज दिला. मनपा उपायुक्त रोहिदास बहिरम यांना अनधिकृत मोबाइल टॉवरची माहिती दिली. त्यानंतर पंचवटी विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे यांना सूचना देत सदर अनधिकृत टॉवरबाबत कारवाई करण्यास सांगितले. अतिक्रमण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सदर अनधिकृत टॉवरचे चालू काम बंद पाडत साहित्य जप्त केले आहे.