आगळ्यावेगळ्या संकल्पना : नाशिकमध्ये वैविध्यपूर्ण गणरायांचे भाविकांना आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:10 PM2018-09-19T14:10:21+5:302018-09-19T14:17:32+5:30

धार्मिक-पौराणिक, सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांसह काही मंडळांनी वैविध्यपूर्ण इको फ्रेण्डली गणपती साकारून आगळावेगळा संदेश दिला आहे. शहरातील वैविध्यपूर्ण गणराय भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

Unique concepts: Attractions of devotees of diverse dynasties in Nashik | आगळ्यावेगळ्या संकल्पना : नाशिकमध्ये वैविध्यपूर्ण गणरायांचे भाविकांना आकर्षण

आगळ्यावेगळ्या संकल्पना : नाशिकमध्ये वैविध्यपूर्ण गणरायांचे भाविकांना आकर्षण

googlenewsNext
ठळक मुद्देई-कचऱ्याच्या माध्यमातून नऊ फुटी बाप्पाची मुर्ती वर्तमानपत्रांच्या माध्यामातून गणपती साकारले. खराट्यांपासून गणरायांचे रुप साकारुन स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न

नाशिक : गीतकार यशवंत देव यांनी कोटि कोटि रुपे तुझी... या भक्तीगीतातून भगवंताच्या रुपांची सांगितलेला महिमा गणेशोत्सवकाळात गणेशभक्तांना अनुभवयास येत आहे. किती रुपे, किती भाव..., याप्रमाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपासून घरगुती गणेशोत्सव मंडळांपर्यंत बहुतांश नाशिककरांनी ‘इको फ्रेण्डली’ गणेशाची रुपे साकारण्यावर भर दिला आहे. शहर व परिसरातील वैविध्यपूर्ण गणेशाची रुपे लक्षवेधी ठरत आहेत.
शहरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. धार्मिक-पौराणिक, सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांसह काही मंडळांनी वैविध्यपूर्ण इको फ्रेण्डली गणपती साकारून आगळावेगळा संदेश दिला आहे. शहरातील वैविध्यपूर्ण गणराय भाविकांचे आकर्षण ठरत आहे.


पंचवटीमधील पाथरवटलेनमधील लक्ष्मीछाया मित्र मंडळाने परंपरेनुसार यावर्षी चक्क चार टन उसाचा वापर करुन गणेशाचे रुप साकारले आहेत. शालिमार येथील जय बजरंग मित्र मंडळाने खरट्यांपासून गणरायांचे रुप साकारुन स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. वेध नारी मंचाने तर चक्क ई-कचऱ्याच्या माध्यमातूनच नऊ फुटी बाप्पाची मुर्ती साकारण्याचा प्रयोग केला आहे. तसेच सिडको परिसरातील रायगडनगरमध्ये व एकलहरा येथे झाडाच्या खोडावरच बाप्पाचे रुप साकारण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचा शहरात जागर होत असल्याने घरगुती गणेशमंडळांंनीही त्यावर भर दिला आहे. विविध उपनगरांमधील लहान मंडळांसह अपार्टमेंट, शाळा, महाविद्यालयांमध्येही आगळ्यावेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून गणरायाची रुपे साकारली आहेत. पेठे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी चक्क वर्तमानपत्रांच्या माध्यामातून गणपती साकारले. तसेच नागरिकांनीही देखील आपआपल्या घरात इको-फ्रेण्डली गणरायांची प्रतिष्ठापना केली आहेत. डीजीपीनगर येथील वैशाली पाटील यांनी वांग्यांचा वापर करत गणेशाचे रुप साकारले तर दिल्ली पब्लीक स्कूलमध्ये बांबूपासून गणराय साकारण्यात आले आहेत. खर्जुलमळा येथे श्रावणी सकसुले यांनी टकाऊ वस्तूंपासून गणेशरुप निर्मिती केली आहे.

Web Title: Unique concepts: Attractions of devotees of diverse dynasties in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.