वणी बाजारात वाहनांना रिप्लेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:29 PM2018-02-28T13:29:38+5:302018-02-28T13:29:38+5:30
वणी - वाहन चालवितांना अत्यंत वेगाने चालवू नये की जेणे करून वाहन आपल्या ताब्यातून सुटून जाईल व अपघात होईल. यासाठी वाहन चालवत असतांना कोणतीही नशा करून चालवू नका. वाहन चालवितांना नियमांचे पालन करूनच चालवा. कारण आपल्याला जीव महत्वाचा आहे याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघाताची संख्या कमी होईल असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले. ते वणी येथे उपबाजार आवारात ‘रिप्लेक्टर लावा’ या अभियानाप्रसंगी बोलत होते.
भरत कळसकर : वाहन चालवतांना जीव महत्वाचा
वणी - वाहन चालवितांना अत्यंत वेगाने चालवू नये की जेणे करून वाहन आपल्या ताब्यातून सुटून जाईल व अपघात होईल. यासाठी वाहन चालवत असतांना कोणतीही नशा करून चालवू नका. वाहन चालवितांना नियमांचे पालन करूनच चालवा. कारण आपल्याला जीव महत्वाचा आहे याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघाताची संख्या कमी होईल असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले. ते वणी येथे उपबाजार आवारात ‘रिप्लेक्टर लावा’ या अभियानाप्रसंगी बोलत होते. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्र मासाठी सभापती दत्तात्रय पाटील , जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक माणिकराव सोनवणे , तुकाराम कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, डॉ योगेश गोसावी , उपसरपंच विलास कड , मधुकर भरसट, मुन्ना मनियार , संजय उंबरे , नंदलाल चोपडा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते . यावेळी दतात्रय पाटील , गणपतराव पाटील, माणिकराव सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .बाजार समितीत आलेले बैलगाडी अथवा ट्रेलर यांना रिप्लेक्टर नसल्याने अपघातांची संख्या वाढते ती टाळण्यासाठी रिप्लेक्टर लावा उपक्र म स्तुत्य असून व्यसन करून वाहन चालविणे विना परवाना वाहन चालविणे हे धोक्याचे असून प्रत्येक कुटूंब हे आपले कुटूंब आहे याची काळजी घेतल्यास अपघात टळण्यास मदत होईल असेही आवाहन पाटील यांनी केले. प्रादेशिक परिवहन विभागाचे हेमंत हेमाडे, प्रज्ञा अभंग, प्रशांत थोरात , राहूल कदम, पो उपनिरीक्षक नितिन पाटील, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, संचालक व वाहन धारक उपस्थित होते .