वेणूनादची सुश्राव्य आनंददायी मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:12 AM2017-09-10T01:12:01+5:302017-09-10T01:12:23+5:30
येथील वेणूनाद सुषीर संवाद अकादमीच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘वेणुर्मधुरम’ या मैफलीत ठाणे येथील पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य विवेक सोनार यांच्या सुश्राव्य बासरीवादनाची अनुभूती रसिकांनी घेतली. याचवेळी बासरीवादक मोहन उपासनी यांच्या विद्यार्थ्यांचा बासरी सहवादनाचा कार्यक्र मही आयोजित करण्यात आला होता.
नाशिक : येथील वेणूनाद सुषीर संवाद अकादमीच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘वेणुर्मधुरम’ या मैफलीत ठाणे येथील पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य विवेक सोनार यांच्या सुश्राव्य बासरीवादनाची अनुभूती रसिकांनी घेतली. याचवेळी बासरीवादक मोहन उपासनी यांच्या विद्यार्थ्यांचा बासरी सहवादनाचा कार्यक्र मही आयोजित करण्यात आला होता.
प. सा. नाट्यगृहात आयोजित या कार्यक्र मात विवेक सोनार यांनी विविध रागदारीवर धून सादर करत आपल्या बासरीवादनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर पुणे येथील सत्यजित तळवलकर यांनी साथ केली. दरम्यान, वेणूनाद अकादमीच्या ५० विद्यार्थ्यांनी बासरीचे सहवादन सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. रसिकांना नाविनोत्तम कार्यक्र माची मेजवानी प्रतिवार्षिक देणे हेच वेणूनादचे ध्येय असल्याचे मोहन उपासनी यांनी सांगितले.