विश्वास नांगरे पाटील नाशिकचे नवे पोलीस आयुक्त?, डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 10:52 AM2019-02-22T10:52:18+5:302019-02-22T10:52:39+5:30
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
नाशिक : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सिंगल यांनी त्यांच्या बदलीच्या चर्चेला सकारात्मक दुजोरा दिला असून, नवे आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
मात्र राज्याच्या गृहविभागाकडून सिंगल यांच्या बदलीचे आदेश अद्याप पारीत करण्यात आलेले नाहीत. औरंगाबाद महानिरीक्षकपदी डॉ. रवींद्र सिंगल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. सांगली जिल्ह्यातील नांगरे पाटील मूळ रहिवासी असल्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटील यांची नाशिकला पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
कोण आहेत विश्वास नांगरे पाटील?
महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्थान अन् पोलीस सेवेते बेधडक काम करणारे आयपीएस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटलांना सर्वच ओळखतात. विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे त्यांचे मूळ गाव आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा अतिशय कष्टप्रद होता. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस सेवेत येणाऱ्या तरुणांसाठी विश्वास नांगरे पाटील हे आदर्श आहेत.
विश्वास नांगरे पाटील यांनी आतापर्यंत भूषवलेली पदं
- लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
- अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
- पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
- मुंबई पोलीसदल उपायुक्त
- ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
- अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
- पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र