मतदार जागृती : विद्यार्थ्यांचे तपासणार सामान्यज्ञान निवडणूक आयोग घेणार परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:26 AM2017-11-13T00:26:35+5:302017-11-13T00:27:22+5:30

निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Voter awareness: Examination will be conducted by General Election Commission for the students! | मतदार जागृती : विद्यार्थ्यांचे तपासणार सामान्यज्ञान निवडणूक आयोग घेणार परीक्षा !

मतदार जागृती : विद्यार्थ्यांचे तपासणार सामान्यज्ञान निवडणूक आयोग घेणार परीक्षा !

Next
ठळक मुद्दे निर्णयामुळे मतदार जागृतीला हातभारमतदार जागृती मोहीम हातीअनेक प्रकारचे प्रश्न परीक्षेत

नाशिक : निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या पद्धतीसह एकूणच भारतीय समाजशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान आहे हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत तालुका पातळीवर परीक्षा घेतल्यानंतर जिल्हास्तरीय उत्तीर्ण निवडण्यात येणार आहेत. आयोगाच्या या नवीन निर्णयामुळे मतदार जागृतीला हातभार लागण्यास मदत होणार आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांपासून मतदार जागृती मोहीम हाती घेतली असून, मतदानाचा टक्का वाढून लोकशाही अधिक सृदृढ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती महत्त्वाची असल्याचे ओळखून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता वयाच्या अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रिया, निवडणूक पद्धती, निवडणूक आयोग याबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी सामान्यज्ञान चाचणी परीक्षा घेणाचे ठरविले आहे. साधारणत: १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यासाठी परीक्षार्थी ठरविण्यात आले आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासाठी ३९ प्रश्न आयोगाने निश्चित केले आहेत. मात्र स्थानिक पातळीवर त्यात निवडणुकीसंदर्भात आणखी काही प्रश्न यंत्रणेला आवश्यक वाटत असतील तर प्रश्नांची संख्या वाढविण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे समाजशास्त्राबाबतचे ज्ञान जाणून घेणाºया प्रश्नांचा या प्रश्नपत्रिकेत समावेश आहे. मतदार नोंदणीसाठी किती वय असावे, त्यासाठी कोणता अर्ज भरावा, भारतात कोणती मतदान पद्धती आहे, ईव्हीएमचा पूर्ण अर्थ काय, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, किती वर्षे वयोगटातील व्यक्ती उमेदवारी करू शकतो, लोकसभेची निवडणूक किती वर्षांनी, राज्यसभेची निवडणूक किती वर्षांनंतर होते असे अनेक प्रकारचे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात येणार आहेत.

Web Title: Voter awareness: Examination will be conducted by General Election Commission for the students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.