सावधान : मकरसंक्रांतीला पतंग उडविणार असाल तर तुमच्यावरही ओढावू शकते ‘संक्रांत’; मांजा देऊ शकतो ‘धक्का‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:40 PM2017-12-11T20:40:33+5:302017-12-11T21:00:43+5:30

पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी दक्षता घेणे आणि इतरांनी लक्ष ठेवणे गरजेचे ठरते.

 WARNING: If you are going to fly a moth to Makar Sankranti, then you can also apply it to 'Sanctity'; Can push 'push' | सावधान : मकरसंक्रांतीला पतंग उडविणार असाल तर तुमच्यावरही ओढावू शकते ‘संक्रांत’; मांजा देऊ शकतो ‘धक्का‘

सावधान : मकरसंक्रांतीला पतंग उडविणार असाल तर तुमच्यावरही ओढावू शकते ‘संक्रांत’; मांजा देऊ शकतो ‘धक्का‘

Next
ठळक मुद्दे धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा. दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका. वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.

नाशिक : वीजतारांमध्ये अडकलेली पतंग काढताना जिवावर बेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेली पतंग काढणे धोक्याचे ठरते. याकरता दक्षता घेणे आवश्यक आहेच. परंतु आता धातूमिश्रित मांजादेखील बाजारात मिळत असल्याने अशा मांजाचा वीजतारांशी संपर्क आला तर त्यातूनही वीजप्रवाह प्रवाहित होऊ शकतो. त्यामुळे पतंगबाजीचा धोका अधिकच वाढला आहे.
मकर संक्रतीला महिनाभराचा कालावधी असला तरीही पतंगोत्सव साजरा करण्यास आतापासूनच सुरु वात झाली आहे. त्यातच वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात शहरातील दहा वर्षीय बालकाला जीव गमवावा लागण्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना लघु व उच्चदाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगावी व विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. अनेकवेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरु ण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी दक्षता घेणे आणि इतरांनी लक्ष ठेवणे गरजेचे ठरते.

महावितरणचे आवाहन
जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतणारे ठरू शकते तसेच वीज वाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासन्तास वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हे लक्षात ठेवा
* वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतू शकते.
* वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टाहास करू नका.
* वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.
* धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.
* दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका.

Web Title:  WARNING: If you are going to fly a moth to Makar Sankranti, then you can also apply it to 'Sanctity'; Can push 'push'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.