विश्वशांती सायकल यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:57 AM2017-10-07T01:57:00+5:302017-10-07T01:57:34+5:30
स्वच्छ भारत विश्वशांती सायकल यात्रेचे झोडगे ग्रामपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. छत्तिसगडमधील जलसा ते मुंबई या सायकल यात्रेत सहा तरुण सहभागी झाले आहे.
झोडगे : स्वच्छ भारत विश्वशांती सायकल यात्रेचे झोडगे ग्रामपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
छत्तिसगडमधील जलसा ते मुंबई या सायकल यात्रेत सहा तरुण सहभागी झाले आहे. हा चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला जाणार आहे. दरम्यानच्या गावोगावी स्वच्छ भारत निर्माण विश्वशांती, पर्यटन, वृक्षारोपण, पॉलिथिनमुक्त भारत आदी संदेश देत आहे. या सायकल यात्रेचे झोडगे येथे आगमण झाले. यात्रेत सहभागी प्रेमकुमार मिश्रा, जयदेव मित्रा, रावेद्र पाण्डेय व सहकारी याचे झोडगे ग्रामपंचायतीचा वतीने सरपंच जयश्री देसले, डॉ. सुनील देसाई सदस्य किशोर देसले ग्रामविकास अधिकारी आर. डी. ध्यानध्यान बी.ए.पाटील अरूण काळगुडे, भूषण देसले, बंटी देसले आदींनी स्वागत केले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना स्वच्छ भारत निर्माण संकल्पना पटवून दिली. विश्वशांतीसाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग वाढला पाहिजे, इंधनाचा वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. इंधन बचत हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी सायकलीचा वापर झाला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी सायकलीाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.