पालिकेच्या निसर्गोपचार केंद्रात योगशिक्षक प्रशिक्षण
By admin | Published: October 30, 2015 10:45 PM2015-10-30T22:45:48+5:302015-10-30T22:46:33+5:30
पालिकेच्या निसर्गोपचार केंद्रात योगशिक्षक प्रशिक्षण
नाशिक : नाशिकरोड येथील जेतवननगर येथे महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या आरोग्यधाम व निसर्गोपचार केंद्रात योगशिक्षक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या योगशिक्षकांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी योगविद्याधामचे विश्वास मंडलिक, उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे, निसर्गोपचार केंद्राचे प्रवीण देशपांडे, विद्या देशपांडे, जाधव, महानुभाव, गाडेकर आदि उपस्थित होते. यावेळी योगशिक्षक व रुग्णांनी आपले अनुभव कथन केले. या निसर्गोपचार केंद्रात दर महिन्याला निवासी व अनिवासी रुग्णांसाठी योगशिबिरांचे आयोजन केले जाते. आजवर सुमारे ३० हजारहून अधिक रुग्णांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे. या केंद्रातून निसर्गोपचार व योगाद्वारे शारीरिक व्याधींवर उपचार केले जातात. (प्रतिनिधी)