छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:17 IST2019-02-07T13:45:37+5:302019-02-07T14:17:21+5:30
छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा
बीजापूर - छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एकूण दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याआधी झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी) चकमक झाली होती. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता.
SP Bijapur Mohit Garg: 10 Naxals neutralised in an encounter with STF & DRG in Bijapur, 11 weapons recovered #Chhattisgarhpic.twitter.com/OxmHGGpcmL
— ANI (@ANI) February 7, 2019