१५० सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट ‘पीएनबी’कडून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:13 AM2018-04-22T00:13:00+5:302018-04-22T00:13:00+5:30

पीएनबीने आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे गेल्या काही महिन्यांत हेतूत: कर्ज थकविणाºया १५0 कर्जदारांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.

150 passport seized by the defaulters 'PNB' | १५० सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट ‘पीएनबी’कडून जप्त

१५० सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट ‘पीएनबी’कडून जप्त

googlenewsNext

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) तक्रार केल्यानंतर १५0 सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. बँकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. ५0 कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज असणाऱ्या कर्जदारांच्या पासपोर्टची प्रत घेऊन ठेवण्याच्या सूचना सरकारने अलीकडेच बँकांना केल्या आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पासपोर्ट जप्तीची कारवाई झाली आहे.
नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांनी केलेल्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे वादात सापडलेल्या पीएनबी बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएनबीने आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे गेल्या काही महिन्यांत हेतूत: कर्ज थकविणाºया १५0 कर्जदारांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत बँकेने थकबाकीदारांविरुद्ध ३७ एफआयआरही नोंदविले आहेत. गेल्या काही आठवड्यांत बँकेने १0८४ सहेतुक थकबाकीदार घोषित केले आहेत.

मिशन गांधीगिरी
बँकेने ‘मिशन गांधीगिरी’च्या माध्यमातून कर्जवसुलीची अनोखी मोहीम सुरू केली आहे. मे २0१७ मध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली. तिचे चांगले परिणामही दिसून येत आहेत.

Web Title: 150 passport seized by the defaulters 'PNB'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.