मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी - जेटली
By admin | Published: February 1, 2017 11:42 AM2017-02-01T11:42:01+5:302017-02-01T11:55:51+5:30
मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4878 कोटींची तरतूद करण्यात आली असून 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे उद्देश असल्याचे जेटलींनी सांगितले.
2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिवाय ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ग्रामी भागातील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यांसाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून यासंदर्भात 15 हजार कोटींवरुन 23 हजार कोटींपर्यंत तरतूद वाढवण्यात आली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार
मनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य
बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यासाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधणार
पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.
दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद. 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.
ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.
2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.