कर्नाटकातील कारवारजवळ बोट बुडून 8 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:08 PM2019-01-21T18:08:05+5:302019-01-21T20:42:20+5:30
कर्नाटकातील कारवारजवळ समुद्रात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला
बंगळुरू - कर्नाटकातील कारवारजवळ समुद्रात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये एकूण 24 प्रवासी होते. देवदर्शनाला गेलेल्या बोटीला हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.
आज सकाळी ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि कोस्टगार्डच्या जवानांनी सहा जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते. मात्र बोटीतील अन्य प्रवासी बेपत्ता असून, बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. दरम्यान, मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांनी घटनास्थळाकडे प्रयाण केले आहे.
Karnataka: 6 dead after a boat capsized near Karwar, earlier today. There were around 22 people on board. Fisherman and coastguard have found six bodies till now, while others are missing. Search operation underway. pic.twitter.com/NgtJJ8mKWB
— ANI (@ANI) January 21, 2019
Karnataka: Indian Navy launches search operation off Karwar bridge in Kali River after reports that a ferry boat capsized with 24 persons. Navy Chetak helicopter airborne from Goa at 1705, today. Naval divers also on the way. https://t.co/eNlZgXq7dr
— ANI (@ANI) January 21, 2019