लक्ष्यांक पूर्ण केला नाही तर कारवाई आस्तिककुमार पांडेय : समन्वय समितीच्या सभेत इशारा
By admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:29+5:302016-02-02T00:15:29+5:30
जळगाव- विविध योजनांबाबत दिलेला लक्ष्यांक पूर्ण झाला नाही तर कारवाई करावी लागेल, असा इशारा सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी समन्वय समितीच्या सभेत अधिकार्यांना दिला.
Next
ज गाव- विविध योजनांबाबत दिलेला लक्ष्यांक पूर्ण झाला नाही तर कारवाई करावी लागेल, असा इशारा सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी समन्वय समितीच्या सभेत अधिकार्यांना दिला. छत्रपती शाहू महाराज सभागृहा सकाळी ११ वाजता ही सभा झाली. मधल्या सुीचा काळ वगळता तब्बल साडेसहा तास ही सभा चालली. अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी आदींसह जिल्हाभरातील गटविकास अधिकारी, उपअभियंते, आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजना, पाणीटंचाई आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार, रोजगार हमी व इतर योजनांबाबत लक्ष्यांकाच्या तुलनेत कामांची गती फारशी नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मार्च महिन्यापर्यंत दिलेले लक्ष्यांक पूर्ण होऊन ग्रामविकासाची कामे मार्गी लागायला हवीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. ६.३० वाजता ही सभा आटोपली.