अभिनेते कमल हासन यांचा ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 08:22 PM2017-08-15T20:22:32+5:302017-08-15T20:22:57+5:30

भ्रष्टाचार आणि वाढत्या गुन्हेगारीवरुन अभिनेते कमल हासन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. 

Actor Kamal Haasan's attack on Chief Minister on Twitter | अभिनेते कमल हासन यांचा ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

अभिनेते कमल हासन यांचा ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

मुंबई, दि. 15 -  भ्रष्टाचार आणि वाढत्या गुन्हेगारीवरुन अभिनेते कमल हासन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. 
अभिनेते कमल हासन यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपरस्थित केला आहे. त्यांनी ट्विटरवर, जर एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात एखादी दुर्घटना किंवा भ्रष्टाचार झाला, तर राजीनामा दिला पाहिजे. असे असताना कोणत्याही पक्षाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागितला, असा सवाल केला आहे. तामिळनाडूमध्ये गुन्हेगारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. दरम्यान, कमल हासन यांनी तामिळनाडूतील अनेक नेत्यांवर आरोप केले आहे. तसेच, येथील राजकीय घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे. मात्र, यावेळी कमल हासन यांनी थेट मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, गेल्या काही दिवसांपासून कमल हासन राजकीय वर्तुळात चालणा-या घडामोडींवर जास्त ट्विट करताना दिसून येत आहे. यावरुन त्यांची राजकारणात जाण्याची शक्यता असल्याचेही वर्तविण्यात येत आहे. 



याचबरोबर, कमल हासन यांनी आणखी एक ट्विट केले असून यामध्ये त्यांनी तामिळनाडू राज्य अधिक चांगले बनविण्याचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. माझा आवाज बळकट करण्याची कुणामध्ये हिम्मत आहे, असा सवाल करत DMK, AIADMK आणि इतर पक्ष मदत करु शकतात. शिवाय पक्षांकडून मदत नाही मिळाला, तर दुसरा मार्ग शोधू, असे म्हटले आहे. 



कमल हासन आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यात ट्विटर वॉर
चेन्नईमध्ये दोन नावाजलेल्या व्यक्तींची घरं एकमेकांपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. मात्र या दोघांमध्ये शत्रू देशांसारखं नातं आहे. ते दोघे दुसरे, तिसरे कोणी नसून कमल हासन आणि सुब्रमण्यम स्वामी आहेत. एक राज्यसभेचे खासदार आहेत, तर दुसरे दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये ट्विटर वॉर झाल्याचे पाहायला मिळाले. 
 


Web Title: Actor Kamal Haasan's attack on Chief Minister on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.