नवाजुद्दीन नाही तर अजय देवगण साकारणार बाळासाहेबांची भूमिका, आज चित्रपटाचं लॉन्चिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 01:34 PM2017-12-21T13:34:11+5:302017-12-21T13:43:22+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील आधारित चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जागी अजय देवगणची वर्णी लागली आहे.

Ajay Devgan to play Balasaheb Thackeray'ss role in biopic Saheb | नवाजुद्दीन नाही तर अजय देवगण साकारणार बाळासाहेबांची भूमिका, आज चित्रपटाचं लॉन्चिंग

नवाजुद्दीन नाही तर अजय देवगण साकारणार बाळासाहेबांची भूमिका, आज चित्रपटाचं लॉन्चिंग

Next
ठळक मुद्दे बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील आधारित चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जागी अजय देवगणची वर्णी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा लॉन्चिंग सोहळा

मुंबई -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील आधारित चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या जागी अजय देवगणची वर्णी लागली आहे. अजय देवगण प्रमुख भूमिका साकारण्याची शक्यता आहे. आज या चित्रपटाचा लॉन्चिंग सोहळा पार पडणार आहे. अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा चित्रपट लॉन्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 'सरकार' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली भूमिका बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेजवळ जाणारी होती. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'साहेब' असं या बायोपिकचं नाव आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत असणार आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी नवाझुद्दीनचं नाव फायनल झाल्याची चर्चा होती. पण एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आता अजय देवगण बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. याआधी अक्षय कुमार आणि इरफान खान यांच्या नावाचाही विचार केला गेला होता. 

अजय देवगणच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेसाठी अजय देवगण चांगला पर्याय आहे. पण सध्या तो अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तानाजी मालुसरे, रेड आणि टोटल धमाल या चित्रपटांमध्ये तो व्यस्त आहे. अजयला साहेब चित्रपट करायला नक्की आवडेल. कोणत्या अभिनेत्याला बाळासाहेबांची भूमिका करायला आवडणार नाही ?'. पण अजय देवगणने यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांची या चित्रपटाची कथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्ष लागली. चित्रपटाची निर्मितीही तेच करणार आहेत. अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. 'बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांनी मी जास्त ओळखतो. ज्यांच्या आयुष्यात असं बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवलं जाऊ शकतं. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा चित्रपट लोकप्रिय व्हावा', असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

यापूर्वी मराठीत संजय राऊत यांनी 'बाळकडू' हा मराठी चित्रपट बनविला होता. मात्र, त्यात मराठी तरूणाला बाळासाहेबांपासून प्रेरणा कशी मिळते व त्याच्या चेतना जाग्या कशा होतात हे दाखविण्यात आले होते. बाळकडू हा चित्रपट बायोपिक गटात मोडणारा नव्हता. तसंच चित्रपटात फक्त बाळासाहेबांचा आवाज वापरण्यात आला होता. 
 

Web Title: Ajay Devgan to play Balasaheb Thackeray'ss role in biopic Saheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.