सार्वजनिक संपत्तीचे सर्व नुकसान डेरा सच्चा सौदाला भरावे लागणार - उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 07:11 PM2017-08-25T19:11:38+5:302017-08-25T19:20:19+5:30

पंजाब, हरयाणा आणि अन्य राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

All the losses of public property will have to be paid to the true deal - High Court order | सार्वजनिक संपत्तीचे सर्व नुकसान डेरा सच्चा सौदाला भरावे लागणार - उच्च न्यायालयाचे आदेश

सार्वजनिक संपत्तीचे सर्व नुकसान डेरा सच्चा सौदाला भरावे लागणार - उच्च न्यायालयाचे आदेश

Next

पंचकुला, दि. 25 -साध्वी बलात्कार प्रकरणात गुरमीत राम रहीम यांना दोषी ठरवल्यानंतर पंजाब, हरयाणा आणि अन्य राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. झालेले सर्व नुकसान डेरा सच्चा सौदाकडून भरुन घ्यावे असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत. 

कोर्टाने सार्वजनिक संपत्तीचे जे नुकसान झाले आहे त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरज पडली तर, शस्त्रही चालवा असा आदेशच उच्च न्यायालयाने हरयाणा सरकारला दिला आहे. 

हिंसाचारात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. जखमींना सेक्टर 6 मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. बाबा गुरमीत राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांच्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन्स फोडल्या. सुरक्षापथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडयाही फोडाल्या. पंजाबमध्ये मुक्तसर, भटिंडा आणि मानसा येथे संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

पंचकुलामध्ये जमावाने सुरक्षापथकांवरच हल्ला केला. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना तेथे हवेत गोळीबारही करावा लागला. यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे पोलिसांना मागे हटावे लागले. गोळीबारात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक गाडयांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. पंजाबमध्ये दोन रेल्वे स्थानके जाळून टाकल्याचे वृत्त आहे.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या 53 तुकडया आणि हरयाणा पोलिस दलाचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले होते तसेच पंजाब, हरयाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये 72 तासांठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.

न्यायालयात आज राम रहिम यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल सुनावला जाणार असल्याने हरयाणा आणि पंजाबमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खबरदारी म्हणून पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद केली आहे. चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी दिली आहे. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. पंजाब व हरयाणाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. सिरसाजवळच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंचकुलात सीआरपीएफचे जवान तैनात आहेत.

Web Title: All the losses of public property will have to be paid to the true deal - High Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा