Amritsar Train Accident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 09:38 PM2018-10-19T21:38:49+5:302018-10-19T21:39:41+5:30
Amritsar Rail Accident: पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अमृतसर : पंजाबमध्ये अमृतसरजवळील चौरा बाझार येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. यावेळी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींवर मोफत उपचार केले जातील. या अपघाताची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्री सिंग यांनी दिले आहेत.
My govt will give Rs 5 lakh to kin of each deceased & free treatment to injured in govt & pvt hospitals. District authorities have been mobilised on war footing: Punjab CM Capt Amarinder Singh #Amritsarpic.twitter.com/ScXIH2qrpW
— ANI (@ANI) October 19, 2018
पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी काय सांगितले ते पाहा
#WATCH Punjab CM Amarinder Singh says " today's incident has been absolutely tragic. I am going to Amritsar tomorrow. The state is on full alert." pic.twitter.com/RHLO2LxAoa
— ANI (@ANI) October 19, 2018