अण्णा हजारेंना पुन्हा आंदोलन करावं लागणार नाही- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 06:07 PM2018-03-29T18:07:48+5:302018-03-29T18:07:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं आहे. अण्णा आणि नरेंद्र मोदींचं भ्रष्टाचारमुक्तीचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं आहे. अण्णा आणि नरेंद्र मोदींचं भ्रष्टाचारमुक्तीचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य केल्या आहेत. कृषिमूल्य आयोगाला आणखी अधिकार देणार आहोत, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.
अण्णा हजारेंना पुन्हा आंदोलन करावं लागणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. अण्णा हजारे यांनी अखेर सात दिवसांनी उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अखेर यश मिळालं असून, अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना लिंबू पाणी पाजलं आहे.
कृषी अवजारांचा जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर आणणार असल्याचंही केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. तसेच तीन महिन्यांत अंमलबजावणीचं आश्वासन दिलं आहे. लोकपालबाबत कालमर्यादा देण्याची मागणी मान्य केली आहे. अण्णा हजारेंच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं दिलेला ड्राफ्ट अण्णांनी मान्य केलाय.