वाहने चोरणारी आंतरराज्य टोळी अटकेत १४ लाख ५0 हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:08+5:302015-08-20T22:10:08+5:30
सोलापूर : सोलापूर, बीड, पुणे आदी ठिकाणांहून स्कॉर्पिओ, टाटा कंपनीचा टेम्पो, मोटरसायकली चोरणार्या आंतरराज्य टोळीतील पाच जणांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १४ लाख ५0 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Next
स लापूर : सोलापूर, बीड, पुणे आदी ठिकाणांहून स्कॉर्पिओ, टाटा कंपनीचा टेम्पो, मोटरसायकली चोरणार्या आंतरराज्य टोळीतील पाच जणांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १४ लाख ५0 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गणेश नवनाथ हुलगे (रा. पोंधवडी, ता. करमाळा), धनंजय पोपट कांबळे (रा. मोरवड, ता. करमाळा), दीपक संभाजी राजकुळे (रा. लासुर, ता. चोपडा, जि. जळगाव), बाबुराव उर्फ पप्पू मच्छिंद्र साळवे (रा. पोंधवडी, ता. करमाळा), विक्रम कांतीलाल कांबळे (रा. रुई, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, अच्युत शंकर भालेकर (वय ३0, रा. देवगाव, ता. केज, जि. बीड) हा स्कॉर्र्पिओ (एम.एच.२३ ए.डी.२७0७) चालक आहे. त्याला पंढरपूर येथे दहाव्याकरिता जायचे आहे असे सांगून खोट्या नावाने स्कॉर्पिओ ठरवली. त्यानुसार दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. स्कॉर्पिओ घेऊन निघाले. दि.१३ ऑगस्ट रोजी दुपारी बार्शीनाका बीड ते आढेगाव पुढे ७ ते ८ कि.मी. अंतरावर स्कॉर्पिओ थांबवली. चालक अच्युत भालेकर याला मारहाण करून खिशातील १00 रुपये, मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी विशेष पथक नेमण्यात आले होते. बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून वरील सर्व आरोपींना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सर्वांनी गुन्ाची कबुली दिली.ही कामगिरी पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर, सपोनि सुनील खेडेकर, पोसई संदीप चव्हाण, सहायक फौजदार नारायण शिंदे, पो.हे. महिबूब शेख, गोरख गांगुर्डे, अजित वरपे, नारायण गोलेकर, मोहन मनसावले, व्यंकटेश मोरे, अरुण केंद्रे, सागर शिंदे, सचिन मागडे, ईस्माईल शेख, राहुल सुरवसे, समीर शेख आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)चौकट...आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता...गणेश हुलगे याने कर्जत व भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्प्लेंडर व फॅशन अशा २ मोटरसायकली तसेच शिंगणापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीणच्या हद्दीतून टाटा कंपनीचा ४0७ टेम्पो चोरी केल्याचे कबूल केले. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर यांनी दिली. (...................जप्त करण्यात आलेली वाहने २0 जीप...,२0 टेम्पो....नावाने सेव करण्यात आले आहे.........)