मानहानी प्रकरणी अरविंद केजरीवालांना कोर्टाकडून झटका
By admin | Published: March 25, 2017 09:56 PM2017-03-25T21:56:57+5:302017-03-25T21:56:57+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी पतियाला कोर्टाने केजरीवाल यांच्यासहीत आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांवर विरोधात आरोप निश्चित केले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पतियाळा हाऊस कोर्टाने मोठा झटका दिवा आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी पतियाला कोर्टाने केजरीवाल यांच्यासहीत आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांवर विरोधात आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 मे रोजी होणार आहे.
दरम्यान, यावेळी केजरीवाल आणि अन्य 5 जणांनी आपण निर्दोष असल्याचे कोर्टाला सांगितले
अरविंद केजरीवाल यांनी डीडीसीए विरोधात गंभीर आरोप केले होते. भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीएचे पदाधिकारी गुंतलेले आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यानंतर डीडीसीए आणि क्रिकेटर चेतन चौहान यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपामुळे डीडीसीएची प्रतिमा मलीन झाल्याचे डीडीसीएने म्हटले आहे. त्यांच्या बेजाबदार वक्तव्यामुळे डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांचे हे वक्तव्य केवळ टी. व्ही. पुरते मर्यादित न राहता, इंटरनेट आणि वृत्तपत्रांमध्ये देखील आले होते. त्यामुळे देखील डीडीसीएला नुकसान झाल्याचे अर्जात म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वाक्याचा संदर्भ देऊन किर्ती आझाद यांनी देखील त्या वाक्याचा वेळोवेळी उच्चार केला होता.
काय आहे नेमकं प्रकरण ?
अरुण जेटली यांनी डिसेंबर 2015मध्ये केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चड्डा आणि दीपक बाजपेयी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावेळी या सर्वांनी डीडीसीएशी संबंधित खोट आणि अपमानकारक विधान केले होते. यामुळे प्रतिमा मलिना झाल्याचे जेटलींनी म्हटले होते. शिवाय आप नेत्यांनी जेटलींवर डीडीसीएमध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप केला होता. जेटली हे 2013 पर्यंत डीडीसीएचे अध्यक्ष होते.