बाबा राम रहीमचे स्वतःच्याच मुलीसोबत होते अनैतिक संबंध, जावयाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 07:44 AM2017-08-28T07:44:47+5:302017-08-28T12:16:15+5:30

बलात्कार प्रकरणी दोषी आढळलेले बाबा राम रहीमचे स्वतःच्याच मुलीसोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप त्याच्या जावयाने केला आहे.

Baba Ram Rahim kept daughter in room, made me sleep outside' | बाबा राम रहीमचे स्वतःच्याच मुलीसोबत होते अनैतिक संबंध, जावयाचा आरोप

बाबा राम रहीमचे स्वतःच्याच मुलीसोबत होते अनैतिक संबंध, जावयाचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली - पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात आपले मायाजाल निर्माण करणारा डेरा सच्चा सौदा प्रमूख बाबा राम रहीम याला साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून आज त्याला तरुंगातच शिक्षा सुनावण्यात येणार आहे.  या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात नेण्यात येणार आहे. 

बलात्कार प्रकरणी दोषी आढळलेले बाबा राम रहीम यांचे त्यांच्याच मुलीसोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप त्यांच्या जावयाने केला आहे.  जेव्हा बाबा हॉटेलमध्ये जात होते तेव्हा मला शेजारच्या खोलीमध्ये पाठवले जात होते तर माझी बायको रात्री बाबांसोबत राहत होती, असा खुलासा बाबांचा मानलेला जावई विश्वास गुप्ता याने केला आहे. त्याने आरोप केला आहे, की बाबांचे त्यांच्या मानलेला मुलीसोबत अनैतिक संबंध होते. गुप्ताने सांगितले, की बाबाचे पत्नीसोबत पहिल्यापासून संबंध होते हे पाप लपवण्यासाठी त्यांनी सर्वांसमक्ष तिला आपली मुलगी मानली. विश्वास गुप्ता यांनी 2011 मध्ये एका खासगी वाहिनीला दिलेला मुलाखतीमध्ये हे आरोप केले आहेत. सध्या तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये गुप्ताने असेही म्हटले आहे की, 1996 मध्ये बाबाने हरमनप्रीतशी माझं लग्न लाऊन दिले. ते तिला सर्वांसमक्ष आपली मुलगी मानत होते पण हॉटेलमध्ये अथवा गुहेमध्ये त्यांना मी एकत्र पाहिले आहे. 2011 मध्ये गुप्ता यांनी बाबाच्या विरोधात कोर्टात धावही घेतली होती. 

पत्रकाराच्या हत्येचाही आरोप - 
राम रहीमवर कथिर स्वरुपात एका पत्रकाराच्या हत्येचाही आरोप आहे. या पत्रकारानं गुरमीतचे काळे धंदे चव्हाट्यावर आणले होते. या पत्रकाराचं नाव राम चंदेर छत्रपती असं होतं... हा तोच पत्रकार होता ज्यानं सिरसामध्ये दोन साध्वींवर झालेल्या बलात्काराची बातमी आपलं वर्तमानपत्र 'पूरा सच'मध्ये छापली होती.
मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, ही बातमी छापल्यानंतर 24 ऑक्टोबर 2002 मध्ये छत्रपतीच्या घराबाहेर काही अज्ञातांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली होती. घरातून बाहेर बोलावत छत्रपतीवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. आपल्या धाडसी आणि बातम्यांच्या विश्वासार्हतेमुळे छत्रपती पत्रकारिता क्षेत्रात चांगलेच प्रसिद्ध होते. साध्वीनं पंतप्रधानांना लिहिलेलं बेनामी पत्र आपल्या वर्तमानपत्रात छापून छत्रपती यांनी सिरसा आश्रमात होणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण चव्हाट्यावर आणलं होतं. पत्रकार छत्रपती यांच्या हत्येनंतर २५ ऑक्टोबर २००२ मध्ये सिरसा शहर बंद झालं होतं... तेव्हापासून छत्रपती यांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. छत्रपती यांचा मुलगा अंशुलनं आपल्या मृत पित्याला न्याय मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष केलाय.

दरम्यान, आज गुरमीत बाबा राम रहिम याला शिक्षा सुणावण्यात येणार आहे.  त्या पार्श्वभूमीवर डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंचकुला, सिरसा, मनेसर या शहरात लष्करास पाचारण करण्यात आले आहे. ज्या तुरुंगात शिक्षा सुनावण्यात येणार आहे तो सुनारिया तुरुंग रोहतक शहराच्या बाहेरच्या भागात आहे. रोहतकमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. डेराच्या राज्यातील प्रमुख पदाधिका-यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 बाबा गुरमीत राम रहीमयांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता अशी माहिती समोर आली आहे.  एकूण सातजणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता.  धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सातजणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे  राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एखूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण  गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते.  हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत. 
 

समर्थकांनी एकत्रित यावे, यासाठी फोन कॉल करण्यात आले- 
पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे याच्या सुचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे अशा सुचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या. 

सीबीआय कोर्टाने  डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

Web Title: Baba Ram Rahim kept daughter in room, made me sleep outside'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.