लपून-छपून पॉर्न साइट्स पाहणाऱ्यांनो, तुमची कुठलीच माहिती लपून राहत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 11:17 AM2018-12-26T11:17:04+5:302018-12-26T11:32:31+5:30

भारतासह काही देशांमध्ये या साईट्सवर बंदी आणण्यात आली आहे.

Be Aware...! porn sites collecting your information, movements too | लपून-छपून पॉर्न साइट्स पाहणाऱ्यांनो, तुमची कुठलीच माहिती लपून राहत नाही!

लपून-छपून पॉर्न साइट्स पाहणाऱ्यांनो, तुमची कुठलीच माहिती लपून राहत नाही!

Next

नवी दिल्ली : जगभरात मोठ्या प्रमाणावर पॉर्न साईट्स पाहिल्या जातात. यामुळे भारतासह काही देशांमध्ये या साईट्सवर बंदी आणण्यात आली आहे. तरीही वेगवेगळ्या क्लुप्त्या करून या साईट मोबाईल किंवा डेस्कटॉपवर पाहता येतात. मात्र, या साईट्स अन्य वेबसाईटपेक्षा कितीतरी पटींनी अधिकची माहिती चोरत असल्याचे समोर आले आहे. 


ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये युजरचा डेटा हा एक मलईचा प्रकार बनला आहे. यामुळे फेसबुकसारख्या सोशल मिडियालाही हा डेटा विक्रीतून मोठा नफा कमवण्याचा मोह आवरता आलेला नाही. या डेटामध्ये नाव, फोटो, पत्ता, आवडत्या गोष्टी, स्वभाव आदी बाबी अन्य कंपन्यांना विकण्यात येतात. याचा वापर करून जाहीरात कंपन्या तुम्हाला लक्ष्य करतात. मात्र, पॉर्न वेबसाईट युजरची खासगी माहितीही चोरत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. हे खूपच धोकादायक आहे. 


बऱ्याचदा प्रसिद्ध अभिनेत्रींचे खासगी फोटो लीक होण्याच्या घटना घडल्या आहेत. असेच प्रकार अन्य लोकांबाबतीतही होत आहेत. पॉर्न वेबसाईट युजरचा आयपी अॅड्रेस, प्राथिमकता, मागील सर्च केलेल्या गोष्टी आदी गोळा करत आहेत. यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात येत आहे. 


काही वेबसाईट मालवेअरचा वापर करून युजरचे फोटो, टेक्स्ट आदी गोळा करत आहेत. क्वार्टझ् ने दिलेल्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. शिवाय एखादा पॉर्न व्हिडिओ पाहत असताना तो कुठे कुठे थांबवला गेला, कोणता भाग पुन्हा पुन्हा पाहिला गेला, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात आदींची माहिती गोळा करतात. यासाठी बोट्सचाही वापर केला जातो. हा प्रकार अन्य व्हिडिओ स्ट्रिमिंग वेबसाईटकडून केला जात नाही. म्हणजेच अॅडल्ट वेबसाईट युजरची प्रत्येक हालचाल टिपत असतात. 
 

Web Title: Be Aware...! porn sites collecting your information, movements too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.