सावधान ! उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाऊंवर 'वॉच', राजकीय जाहिराती निवडणूक खर्चात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 09:03 PM2019-03-10T21:03:19+5:302019-03-10T21:06:08+5:30
आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच, देशात आचारसंहिता लागू झाली आहे.
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना आचारसंहिता आणि निवडणूक काळासाठी बनविण्यात आलेल्या नियमावलींची माहिती दिली. त्यानुसार उमेदवारांना पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरावरही आयोगाची करडी नजर असणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकउंटची माहिती आयोगाला द्यावी लागणार आहे.
आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच, देशात आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्व नियम सोशल मीडियावरच्या प्रचारालाही लागू होणार आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याचा प्रचार करताना कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या सोशल मीडिया हँडलर्संना काळजीने वागावे लागणार आहे. निवडणूक आयोग प्रत्येक उमेदवाराच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी करणार आहे. तसेच, पेड न्यूज आणि सोशल मीडियावरचा खर्चही निवडणूक खर्चात गृहीत धरला जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी सांगितले आहे.
निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिक ही आयोगाकडे थेट तक्रार करू शकणार आहेत. दोन तांसाच्या आत अशा तक्रारींना निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रतिसाद देणार आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई आहे. फेसबुक ट्विटर आणि युट्यूबवरील राजकीय जाहिरातींचे मूल्यमापन होणार आहे. संबंधित सोशल मीडियाकडून एक तक्रारी अधिकारी नियुक्त करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. आचारसंहिता लागू झाल्याने सरकार काहीही निर्णय घेऊ शकणार नाही. दरम्यान, 1950 नंबर डायल करताच मतदारांना मतदार यादीसंदर्भात माहिती घेता येणार आहे. 3 जून 2019 रोजी 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.
Loksabha Election 2019 : निवडणुका जाहीर होताच मोदींची जनतेला साद, मागितला आशीर्वाद
देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. पहिल्या टप्प्याला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून 39 दिवसांत निवडणुका पार पडतील, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले.