दिल्लीतील बँकेत मोठी चोरी, भिंत फोडून एक कोटी केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:31 AM2017-12-20T11:31:45+5:302017-12-20T11:34:30+5:30

दिल्लीतील मुंडकामध्ये असलेल्या  एका को-ऑपरेटिव्ह बँकेची भिंत फोडून बँकेतून एक कोटी रूपये पळविल्याची घटना घडली आहे.

Big stolen from a bank in Delhi, broke the wall and made one crore | दिल्लीतील बँकेत मोठी चोरी, भिंत फोडून एक कोटी केले लंपास

दिल्लीतील बँकेत मोठी चोरी, भिंत फोडून एक कोटी केले लंपास

Next
ठळक मुद्दे दिल्लीतील मुंडकामध्ये असलेल्या  एका को-ऑपरेटिव्ह बँकेची भिंत फोडून बँकेतून एक कोटी रूपये पळविल्याची घटना घडली आहे.चोरट्यांनी ज्या लॉकर्समध्ये दागिने होते तेच लॉकर तोडल्याचं आढळून आलं आहे.

नवी दिल्ली- दिल्लीतील मुंडकामध्ये असलेल्या एका को-ऑपरेटिव्ह बँकेची भिंत फोडून बँकेतून एक कोटी रूपये पळविल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी ज्या लॉकर्समध्ये दागिने होते तेच लॉकर तोडल्याचं आढळून आलं आहे. पोलिसांना या चोरीबद्दलचा कुठलाही पुरावा अजूनही मिळालेला नाही. 

दिल्ली को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमधील मुंडका ब्रँचमध्ये ही चोरी झाली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता बँक उघडल्यानंतर चोरी झाल्याचं समजलं. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेतील तिजोऱ्या फोडल्या. फक्त रोख रक्कम असलेल्या तिजोऱ्या फोडल्या नाही, तर लॉकर रूममध्येही चोरी केली. या चोरट्यांनी शेकडो खातेधारकांचे लॉकर्स फोडले आहेत.

रविवारी रात्री चोरट्यांनी ही बँक लुटली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. ही चोरी करण्यासाठी चोरांना किमान दोन तास तरी लागले असावेत आणि ही चोरी कमीत कमी 3 ते 4 चोरांनी केली असावी, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. या बँकेच्या बाजुला एक रिकामा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये मोठ्याप्रमाणात गवत उगवलेलं आहे. त्याचा फायदा उचलत चोरांनी या प्लॉटला लागून असलेली बँकेची भिंत तोडली. विशेष म्हणजे या बँकेत दिवसभर एक सिक्यरिटी गार्ड तैनात असतो. पण रात्री एकही सुरक्षारक्षक तैनात नसतो. चोरट्यांनी बँकेच्या आवारात व बँकेच्या आतमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील हार्ड डिस्क काढून नेल्या. 

दरम्यान, चोरांनी एकूण किती लॉकर्स फोडले?, बँकेत काय काय होतं?, किती रोखरक्कम पळविली आली?, चोरट्यांनी काही फाइल्स पळविल्या आहेत?,याबद्दलची माहिती अजून मिळालेली नाही. याप्रकरणचा तपास पोलीस करत असून सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचं समजतं आहे. बँकेकडूनच पोलिसांना एकुण चोरीची माहिती न मिळाल्याचं पोलिसांच्या सुत्रांकडून समजतं आहे.दरम्यान, या बँकेचं मुख्य कार्यालय दरियागंजमध्ये असून दिल्लीत या बँकेच्या एकूण ७० शाखा आहेत.
 

Web Title: Big stolen from a bank in Delhi, broke the wall and made one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.