अमृतसमध्ये निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तीन ठार; दोघे संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:55 PM2018-11-18T12:55:49+5:302018-11-18T17:44:06+5:30
पंजाबमधील एका गावात असलेल्या निरंकारी भवनाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला.
अमृतसर - पंजाबमधील राजासांसी परिसरात रविवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून घडवून आणलेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. अमृतसर जिल्ह्यातील राजासांसी परिसरात असलेल्या आदिलावाल गावातील निरंकारी भवनाला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणण्यात आला.
येथील निरंकारी भवनामध्ये दर रविवारी सत्संगाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे आजही येथे सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने बॉम्ब फेकला. त्यामुळे झालेल्या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोटारसायकलवर कोणताही क्रमांक नव्हता. तर संशयितांनी आपला चेहरा काळ्या कापडाने झाकला होता. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Spot visuals: Several injured in a blast at Nirankari Bhawan in Amritsar's Rajasansi village. More details awaited. #Punjabpic.twitter.com/Fzk0FW4725
— ANI (@ANI) November 18, 2018
स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळ माजला. तसेच धावपळ सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. राजासांसी गावातील निरंकारी भवनात झालेल्या या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत अशी अधिकृत माहिती, आयजी (सरहद्द) सुरिंदर सिंह परमार यांनी दिली.
Uttarakhand: A bus carrying more than 20 passengers falls in a gorge near Damta on Uttarkashi-Yamunotri Highway. More details awaited.
— ANI (@ANI) November 18, 2018