देशभर गोहत्याबंदी आणावी - रामदेव
By admin | Published: March 25, 2016 01:50 AM2016-03-25T01:50:34+5:302016-03-25T01:50:34+5:30
जातीय संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा वाढविण्यासाठी गोहत्येवर देशभरात बंदी आणण्याची गरज आहे. तसेच प्रत्येकाने भारत माता की जय म्हणावे यासाठी
वडोदरा : जातीय संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा वाढविण्यासाठी गोहत्येवर देशभरात बंदी आणण्याची गरज आहे. तसेच प्रत्येकाने भारत
माता की जय म्हणावे यासाठी कायदादेखील बनविण्यात यावा, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले. वडोदरा येथे विमानतळावर ते बोलत होते.
आपल्या संविधानात भारत माता की जय बोलले पाहिजे असे कुठे लिहिले नसले तरी कोणालाही ते बोलण्याची समस्या नसावी.
त्यामुळे कायद्यात तशी तरतूद करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक जण बोलू शकेल, असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. देशभरात गोहत्येबर बंदी आणण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदींना त्यांनी या वेळी विनंतीदेखील केली.
तसेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी कन्हैया कुमारची तुलना शहीद भगतसिंग यांच्याशी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली. आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांचा हा अपमान असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.