बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार

By Admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30

महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.

BSNL department's corpus system | बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार

बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार

googlenewsNext
ान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु दीड महिन्यापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने याचा फटका दूरसंचारच्या ग्राहकांना व विशेषत: शेतकर्‍यांना बसत आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर महान येथील बीएसएनएलची नेट सेवा लगेच बंद पडते. वीजपुरवठा सुरू झाल्यावर २० मिनिटे झाल्यानंतरच इंटरनेटची सेवा सुरू होते.
टॉवरस्थित बॅटरी व्यवस्िति नसल्यामुळे नेट सेवा लगेच सुरू करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. इंटरनेटची सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने बँकेत कनेक्टीव्हिटी मिळत नाही. त्या कारणाने बँक खातेदारांना ताटकळत बसून त्रास सहन करावा लागते. शेतीसंबंधित योजनांसाठी आवश्यक असणारा सातबारा, ८ (अ), उत्पन्नाचा दाखला व अन्य कागदपत्रे काढण्यासाठी इंटरनेट सुरू असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु इंटरनेटच्या असुविधेमुळे शेतकर्‍यांनासुद्धा सेतू केंद्रात बसून इंटरनेट सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते तर बीएसएनएल मोबाइलधारकांच्या मोबाइलमध्ये रेंज राहत नसल्यामुळे त्यांनादेखील त्रास सहन करावा लागतो. इंटरनेट सुविधेबात संबंधितांना विचारले असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. महान हे बार्शीटाकळी तालुक्यातील जास्त लोकसंख्येचे मोठे गाव असून महान गावाला जोडलेली अनेक लहान-मोठी खेडी, गावे जोडली असल्याने शेतकर्‍यांना महत्त्वाची कागदपत्रे काढण्यासाठी महान येथे यावे लागते. परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे त्या शेतकर्‍यांना नाइलाजास्तव बार्शीटाकळीला जाऊन कागदपत्रे आणावी लागत आहेत.
***कोट***
महानस्थित टॉवरजवळ बॅटरीचे दोन सेट आहेत. त्यामधील एक सेट चालू आहे. या बॅटरीचा प्रयोग दोन वेळा केला आहे. परंतु, महान येथे सतत सहा तासापर्यंत वीज भारनियमन घेण्यात येत असल्यामुळे बॅटरीमधील सेल जळतात. म्हणून बॅटरी काम करत नाही. वीजप्रवाह खंडित होताच ऑपरेटर जनरेटर सुरू असतो. परंतु, चार दिवस रात्री ३.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत वीज भारनियमन असल्याने ऑपरेटर रात्रीच्यावेळी जनरेटर कसं सुरू करणार, हा प्रश्नच आहे. वीज भारनियमन सहा तासाऐवजी कमी तासाचे केल्यास ही समस्या मार्गी लागेल व मेन्टेनेसचे काम चालू होऊ शकते.
- एस. ए. वरांगे, तंत्रज्ञ बीएसएनएल, बार्शीटाकळी
(***पुढील मजकूर जोड १ वर***)

Web Title: BSNL department's corpus system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.