सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द

By admin | Published: June 30, 2017 05:28 PM2017-06-30T17:28:08+5:302017-06-30T17:28:08+5:30

सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा शुक्रवारी रद्द करण्यात आली आहे

Canceling the Kailash Mansarovar Yatra from Sikkim's Nathu La | सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द

सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा शुक्रवारी रद्द करण्यात आली आहे. एक अधिकारी म्हणाला, सिक्कीममध्ये गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरून वाद सुरू आहे. त्यामुळे नाथू लाचा रस्ता खुला करण्यात आला नाही. कैलास मानसरोवर यात्रा रद्द केल्यानंतर जवळपास 800 भाविक निराश झाले आहेत. मात्र उत्तराखंड मार्गे यात्रा सुरूच राहील.

भारतीय लष्करानं चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा उलटा कांगावा चीननं सुरू केला आहे. चीननं सिक्कीममध्ये नियंत्रण रेषेच्या वादाला भारत जबाबदार असल्याचा आरोप केला होता. चीनच्या पीपल्स लिब्ररेशन आर्मीने सुद्धा भारतीय जवानांसोबत धक्काबुक्की केली होती. तर बुधवारपासून नाथू ला खिंडीतून कैलास मानसरोवरला जाणा-या यात्रेकरूंना नाथू ला जवळ थांबवण्यात आलं आहे.

2015मध्ये चीनने कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी नाथू ला खिंडीतील मार्ग खुला केला होता. हा मार्ग तिबेटमार्गे नाथू ला खिंडीतून जातो. जोपर्यंत नियंत्रण रेषेवरून भारतीय जवान मागे हटत नाहीत, तोपर्यंत नाथू ला खिंडीचा मार्ग खुला करणार नसल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं सीमापार गेलेल्या जवानांना तात्काळ परत बोलावावं, असं आवाहनही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी केलं होतं. हिमालयातील सिक्कीम नाथू ला मार्ग समुद्र सपाटीपासून 4 हजार मीटरवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात हा मार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अधिक भारतीय यात्रेकरू या मार्गानं जाऊ शकत होते. सध्याचा मार्ग लिपुलकेश खिंडीतून जात असून, 2013 साली उत्तराखंडात आलेल्या भीषण पुरात हा मार्ग खराब आणि नादुरुस्त झाला होता.
(सीमेवरून लष्कर हटवा अन्यथा मानसरोवरचा रस्ता बंद, चीनची भारताला धमकी)
(चीन म्हणते, आम्ही नव्हे, भारतानेच केली घुसखोरी!)
उत्तराखंड आणि नेपाळमार्गे कैलासकडे जाणारा मार्ग नैसर्गिक रचनेमुळे अवघड आहे, या मार्गावर बराच प्रवास खेचराच्या पाठीवर बसून करावा लागतो. याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी यांनी कैलास यात्रेसाठी दुसऱ्या मार्गाचा प्रस्ताव मांडला होता. नाथू ला खिंडीतून जाणाऱ्या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना 1500 किमीच्या मार्गापर्यंत बसने जाता येत होते. हा नवा मार्ग सुरू करण्यासाठी तिबेटी लोकांनी बरीच तयारी केली होती. या 1 हजार यात्रेकरूना दरवर्षी परवाना दिला जातो. 18 तुकड्यांत हे लोक यात्रेसाठी पाठवले जातात. ही संपूर्ण यात्रा 23 दिवसांची असून 19 दिवस प्रवासात तर चार दिवस वैद्यकीय तपासणीसाठी असतात. यात्रेचा एकूण खर्च दर माणशी 1.80 लाख रुपये येतो.

 

Web Title: Canceling the Kailash Mansarovar Yatra from Sikkim's Nathu La

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.