शासनामुळेच शेतकरी अडचणीत कुमार सप्तर्षी : पारनेर महाविद्यालयात दुष्काळावर चर्चासत्र

By admin | Published: January 14, 2017 12:06 AM2017-01-14T00:06:25+5:302017-01-14T00:06:25+5:30

पारनेर : शेतीचे बाजारभाव, निसर्गाचा लहरीपणा असताना शासनाचा दुष्काळाबाबत सारखा बदलत असलेला दृष्टिकोनच शेतकर्‍यांना अडचणीत आणत आहे, असे समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले़

For the cause of farmers, farmers are in crisis: Kumar Saptari: Duration of discussion on drought in Parner College | शासनामुळेच शेतकरी अडचणीत कुमार सप्तर्षी : पारनेर महाविद्यालयात दुष्काळावर चर्चासत्र

शासनामुळेच शेतकरी अडचणीत कुमार सप्तर्षी : पारनेर महाविद्यालयात दुष्काळावर चर्चासत्र

Next
रनेर : शेतीचे बाजारभाव, निसर्गाचा लहरीपणा असताना शासनाचा दुष्काळाबाबत सारखा बदलत असलेला दृष्टिकोनच शेतकर्‍यांना अडचणीत आणत आहे, असे समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले़
नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे पारनेर महाविद्यालय व युनिक ॲकॅडमी यांच्यावतीने पारनेर महाविद्यालयात महाराष्ट्रातील दुष्काळाचे अर्थ-राजकारण व आधुनिक महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर होते. सप्तर्षी म्हणाले, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकर्‍यांच्या समस्याही तशाच असून डिजिटल युगाने शेतकर्‍यांचे उत्पादन वाढणार नाही. दुष्काळात राजकारण शिरल्याने त्याचा अर्थकारणावर परिणाम होत आहे.
प्राचार्य आहेर म्हणाले, राज्यात पारनेर तालुक्यासह सुमारे तीनशे तालुके दुष्काळी आहेत़ या दुष्काळी तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय पाणी नसल्याने येथील शेतकरीही अडचणीत सापडला आहे. त्यांचे अर्थकारण बिघडले़ त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शिक्षणावर होत आहे.
राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.गोकुळ मंुढे यांनी स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.उमेश बगाडे, डॉ. आर. एस. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, संजय वाघमारे, प्रा.सुधीर वाघ, प्रा. बी. जी. काकडे, प्रा. अशोक शिंदे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

फोटो ओळी : पारनेर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात किसानपत्रिकेेचे विमोचन करताना समाजवादी नेते माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, डॉ. उमेश खराडे, डॉ. एस. ए. देशपांडे, उपप्राचार्य तुकाराम थोपटे.
छाया-किरण शिंदे पारनेर

Web Title: For the cause of farmers, farmers are in crisis: Kumar Saptari: Duration of discussion on drought in Parner College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.