छत्तीसगडमध्ये आयईडी ब्लास्ट, 2 जवान गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 09:47 AM2019-05-21T09:47:47+5:302019-05-21T10:14:16+5:30

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ आयईडी ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान जखमी झाले आहेत.

Chhattisgarh 2 District Reserve Guard personnel injured in an IED blast near Gogunda | छत्तीसगडमध्ये आयईडी ब्लास्ट, 2 जवान गंभीर जखमी

छत्तीसगडमध्ये आयईडी ब्लास्ट, 2 जवान गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देछत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ आयईडी ब्लास्ट झाला आहे.ब्लास्टमध्ये जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ आयईडी ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (21 मे) छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ झालेल्या आयईडी ब्लास्टमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. सुकमाचे सहायक पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या जवानांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने विमानाने रायपूर येथे हलवण्यात येत आहे. 


काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये क्यूआरसीच्या 15 जवानांसह 16 जणांचा मृत्यू झाला होता. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रात घडवून आणलेला हा काही पहिलाच हल्ला नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत.


छत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या स्फोटामध्ये भाजपचे आमदार व चार पोलीस ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडामधील जंगलातून भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी स्फोट घडवून आणला होता. त्यात आमदार मांडवी व चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी त्या वाहनांवर गोळीबारही केला होता. आ. मांडवी व भाजपाचे स्थानिक नेते प्रचारासाठी जात असताना नक्षल्यांनी वाहनांपाशी स्फोट घडवून आणला. दंतेवाडा हा भाग बस्तर मतदारसंघात येतो. बस्तर हा भाग नक्षलग्रस्त असल्याने तिथे सीआरपीएफचे 80 हजार जवान तैनात करण्यात आले तसेच ड्रोनचीही मदत घेतली गेली नक्षली हल्ल्याचे वृत्त येताच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यांनी आ. मांडवी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आ. मांडवी यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही म्हटले होते. तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही या प्रकाराचा निषेध केला होता. 

पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी येथून सुरू झालेला नक्षलवाद आता देशातील 11 राज्यांमधील 90 जिल्ह्यांत फोफावला आहे. सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेतली असली तरी नक्षली हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे. गेल्या सात वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुरक्षा दलांच्या होणाऱ्या जीवितहानीमध्ये घट झाली असती तरी छत्तीसगडमधील दंडेवाडा आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी आपले प्रभावक्षेत्र कायम राखले आहे. 
 

Web Title: Chhattisgarh 2 District Reserve Guard personnel injured in an IED blast near Gogunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.