Bhupesh Baghel : "माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 05:12 PM2024-04-26T17:12:11+5:302024-04-26T17:23:19+5:30

Lok Sabha Elections 2024 And Bhupesh Baghel : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजनांदगावमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे.

chhattisgarh lok sabha election 2024 phase 2 bhupesh baghel alleged on evm | Bhupesh Baghel : "माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप

Bhupesh Baghel : "माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 13 राज्यांतील 88 लोकसभा जागांवर मतदान पार पडलं आहे. यासोबतच छत्तीसगडमधील तीन जागांवरही मतदान झालं. राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर या जागांवर मतदान झालं. याच दरम्यान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजनांदगावमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे.

भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं आहे. "लोकसभेचे मतदार फोन करून तक्रार करत आहेत की, ईव्हीएममध्ये इतर उमेदवारांचा फोटो मोठा आणि स्पष्ट आहे पण माझा फोटो लहान आणि तुलनेने अस्पष्ट आहे. निवडणूक आयोगाने मागितल्याप्रमाणे फोटो देण्यात आला आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेच्या दाव्याचा पर्दाफाश होतो. हे षड्यंत्र मुद्दाम केलं गेलं आहे का? मात्र याने निकाल बदलणार नाही" असं भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

दुसऱ्या टप्प्यात आज छत्तीसगडमधील राजनांदगाव, महासुमंद या तीन जागांवर मतदान झालं आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत या तीन जागांवर 53.09 टक्के मतदान झाले आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे राजनांदगावमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. याआधी पहिल्या टप्प्यात छत्तीसगडच्या बस्तर जागेवर मतदान झाले होते.
 

Web Title: chhattisgarh lok sabha election 2024 phase 2 bhupesh baghel alleged on evm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.