फाईल्स जप्तीवरून संघर्ष शिगेला

By admin | Published: December 17, 2015 01:12 AM2015-12-17T01:12:17+5:302015-12-17T01:12:17+5:30

सीबीआयने मंगळवारच्या शोधमोहिमेत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाशी संबंधित फाईल्स जप्त केल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे वादात भर पडली

Conflicts over files confiscation of Shigella | फाईल्स जप्तीवरून संघर्ष शिगेला

फाईल्स जप्तीवरून संघर्ष शिगेला

Next

नवी दिल्ली : सीबीआयने मंगळवारच्या शोधमोहिमेत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाशी संबंधित फाईल्स जप्त केल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे वादात भर पडली असतानाच या तपास संस्थेने आरोप फेटाळत राजकीय संघर्ष शिगेला पोहोचविला आहे.
सीबीआयने दिल्ली क्रिकेट संघटनेशी (डीडीसीए) संबंधित फाईल्सची छाननी केली, असा आरोप केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केल्यामुळे केंद्र आणि दिल्ली-सरकारदरम्यानचे कटुत्व नव्या वळणावर गेले आहे. सीबीआयने प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्यासंबंधी नव्हे, तर दिल्ली क्रिकेट संघटनेशी संबंधित फाईल्स जप्त केल्या आहेत. सीबीआयने मुख्यमंत्री कार्यालयावर छापा मारला नसल्याचा दावा करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेची दिशाभूल केली असल्याचा आरोपही केजरीवालांनी केला. सीबीआयने डीडीसीएसंबंधीच्या फाईल्स माझ्याच कार्यालयात वाचल्या. भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कोणताही तपास झाला नाही. गेल्या एक महिन्यातील फायली कुठून कुठे गेल्या याची माहिती असलेली आयटेम-७ फाईल तपासल्या गेली, असे केजरीवाल यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

चौदा ठिकाणी छापे राजेंद्र कुमार यांची पुन्हा चौकशी...
सीबीआयने दिल्लीचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांची बुधवारी पुन्हा चौकशी केली. त्यांच्या कार्यालयावर मारण्यात आलेला छापा योग्यच असून जप्त केलेल्या फाईल्सची यादी न्यायालयाला सादर केली जाईल, असेही सीबीआयचे प्रवक्ते देवप्रीतसिंग यांनी स्पष्ट केले. सीबीआयने एकूण १४ जागी छापे मारले असून स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत जप्तीची प्रक्रिया पार पाडली आहे.
राजेंद्र कुमार हे १९८९ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये २८ लाख रुपयांच्या बँक खात्यांतील गुंतवणुकीसंबंधी कागदपत्रे आहेत.

दुग्गल यांच्याकडे आढळल्या मुदत ठेवी
इंटिलिजन्स कम्युनिकेशन्स सिस्टिम इंडियाचे (आयसीएसआयएल)माजी व्यवस्थापकीय संचालक ए. के. दुग्गल यांच्याकडे सुमारे १.६६ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीसंबंधी दस्तऐवज आढळून आल्याचा दावाही सीबीआयने केला.

छापा का टाकला?- शत्रुघ्न
४नेहमी पक्षविरोधी भूमिका अवलंबणारे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सीबीआयने आत्ताच छापा का मारला असा सवाल करीत आश्चर्य व्यक्त केले आहे. राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयात शोध घेण्याचा सल्ला कुणी दिला? असेही ते म्हणाले. त्याच वेळी केजरीवाल यांनी मोदींना भ्याड आणि मनोरुग्ण म्हटल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ही निश्चितच छाप्यासाठी योग्य वेळ नव्हती. हा डाव आमच्यावरच उलटणार नाही, अशी आशा आणि प्रार्थना करू या, असे त्यांनी टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले.

Web Title: Conflicts over files confiscation of Shigella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.