सीबीआयवर ‘सीव्हीसी’ची नजर
By admin | Published: January 31, 2015 01:53 AM2015-01-31T01:53:09+5:302015-01-31T01:53:09+5:30
सीबीआयच्या कामकाजावर निगराणीसाठी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आपली यंत्रणा बळकट केली आहे.
Next
नवी दिल्ली : सीबीआयच्या कामकाजावर निगराणीसाठी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आपली यंत्रणा बळकट केली आहे. कोलगेट आणि अन्य संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची प्रकरणे पाहता तपासाच्या प्रगतीबाबत सखोल आढावा घेतला जाणार आहे.
कोट्यवधी रुपयांच्या कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्याबाबत तपासावरून सीबीआय आणि सीव्हीसीमध्ये मतभेद आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या अनेक प्राथमिक चौकशा बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला असून सीव्हीसीचा त्याला विरोध आहे. जी प्रकरणे बंद करायची आहेत, त्याबाबत छाननी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीव्हीसीला दिला आहे.