दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी ते गौरी हत्यांची पद्धत एकसारखीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:45 AM2017-09-08T01:45:38+5:302017-09-08T01:46:10+5:30
नरेंद्र दाभोलकर (२०१३), गोविंद पानसरे (२०१५) आणि एम.एम. कलबुर्गी (२०१५) यांची आणि पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही एकाच प्रकारे गोळ्या झाडून झाली आहे.
बंगळुरू : नरेंद्र दाभोलकर (२०१३), गोविंद पानसरे (२०१५) आणि एम.एम. कलबुर्गी (२०१५) यांची आणि पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही एकाच प्रकारे गोळ्या झाडून झाली आहे. हत्या करण्याची पद्धत एकच असली तरी तपासाच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असल्याने निष्कर्षापर्यंत जाता येईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गौरी लंकेश यांची हत्या झाली, तेथून पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून, मास्क लावलेल्या चेहºयांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कलबुर्गी हत्येचा तपास करणाºया पोलीस अधिकाºयाने सांगितले की, या चारही हत्या प्रकरणांत ७.६५ मि.मी.चे काडतूस वापरण्यात आले होते.
या चार हत्याकांडांत वेगवेगळ्या संस्था तपास करीत आहेत. एका प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे. त्यामुळे या चार तपास प्रकरणांत समन्वय राहू शकतो का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
कलबुर्गी प्रकरणाचा तपास करणाºया कर्नाटकातील सीआयडीने अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केलेली नाही, तर दाभोलकर प्रकरणाचा तपास करणाºया सीबीआयने आणि गोविंद पानसरे प्रकरणाचा तपास करणाºया महाराष्ट्र एसआयटीने या प्रकरणात अटक करून आरोपपत्रही दाखल केले आहे. दोन्ही प्रकरणांतील आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत. (वृत्तसंस्था)
आयएनएसकडून निषेध
नवी दिल्ली : गौरी लंकेश यांच्यावरील हल्ल्याचा इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) संपूर्ण वृत्तपत्र माध्यमांच्या वतीने निषेध करीत असल्याचे अध्यक्ष सोमेश शर्मा यांनी म्हटले आहे. गौरी लंकेश अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कट्टर पुरस्कर्त्या होत्या. पत्रकारांवर सतत होणारे हल्ले वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. लंकेश यांच्या जाण्यामुळे भारतीय वृत्तपत्र परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. लंकेश यांच्या हत्येच्या तपासाला गती देऊन हल्लेखोरांना त्वरित शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणीही आयएनएसने केली आहे.