केसांचा टोप घालून नमाजपठण करु नका - देवबंद
By admin | Published: August 9, 2016 12:02 PM2016-08-09T12:02:56+5:302016-08-09T12:02:56+5:30
देशातील सर्वात मोठी मुस्लिम शिक्षण संस्था दारूल उलूम देवबंदने मुस्लिमांना नवीन सल्ला दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ९ - देशातील सर्वात मोठी मुस्लिम शिक्षण संस्था दारूल उलूम देवबंदने मुस्लिमांना नवीन सल्ला दिला आहे. केसांचा कुत्रिम टोप आणि कुत्रिम दाढी लावून नमाज पठणाला बसू नका असा सल्ला देवबंदने दिला आहे.
केसांचा टोप आणि कुत्रिम दाढीमुळे नमाज पठण अपूर्ण रहाते असे देवबंदने म्हटले आहे. नमाजपठणापूर्वी हात-पाय, चेहरा धुणे आणि डोक्यावर पाणी घेणे आवश्यक आहे. पण केसाच्या टोपामुळे पाणी डोक्याच्या त्वचेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे 'वाझू'चा उद्देश पूर्ण होत नाही आणि शरीर अशुद्ध रहाते असे देवबंदचे प्रवक्ते अश्रफ उस्मानी यांनी सांगितले.
केसांचा विग घालणे इतके आवश्यक असेल तर, नमाजपठणाच्यावेळी तो विग काढून ठेवावा असे उस्मानी यांनी सांगितले. ज्यांनी केसांचे प्रत्यारोपण ( हेअर ट्रान्सप्लांट) केले आहे त्याने काही समस्या नाही असेही देवबंदने स्पष्ट केले.