टीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखावा; राहुल गांधी यांचे सोशल मिडिया टीमला धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2017 01:33 PM2017-11-12T13:33:37+5:302017-11-12T13:35:07+5:30
भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखला जावा अशा सूचना राहुल गांधी यांनी आज त्यांच्या सोशल मिडिया टीमशी संवाद साधताना केल्या.
बनासकांठा : भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखला जावा अशा सूचना राहुल गांधी यांनी आज त्यांच्या सोशल मिडिया टीमशी संवाद साधताना केल्या. ते सध्या गुजरात दौ-यावर आहेत.
'आमच्या सत्तेच्या काळात नरेंद्र मोदी विरोधात असताना ते तत्कालीन प्रधानमंत्री यांच्यावर अपमानजनक टिपणी करत , त्या पदाचा अनादर होईल असे ते बोलत. मात्र, आम्ही प्रधानमंत्री पदाचा पूर्ण आदर करत चुकांवर बोट ठेवत आहोत' अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सोशल मीडिया टीमशी संवाद साधला.
आम्हाला आमची मर्यादा ओलांडायची नाही
जेव्हा सरकारच्या धोरणात उणीवा असतात तेव्हा आम्ही त्या उणीवा उघड करतो, अशा वेळी आम्ही केवळ भाजप व प्रधान्मात्री मोदी यांच्यावरच बोट ठेवत असतो. ते प्रधानमंत्री पदाचा अपमान करायचे मात्र आम्ही पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही. हाच मोदी आणि आमच्यामधील फरक आहे. मोदी आमच्याबद्दल काहीही बोलले तरी आम्ही आमच्या मर्यादेतच राहून त्याला उत्तर देणार आहोत', असेही राहुल गांधी म्हणाले. यासोबतच त्यांनी भाजप व प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका करताना सर्वांनी प्रधानमंत्री पदाचा आदर ठेऊन टीका करावी असा सल्ला त्यांच्या मिडिया टीमला दिला.
Whatever we do, spot Modi's faults or disturb BJP, we won't disrespect PM's position. When Modi Ji was in opposition he used to speak with disrespect about PM. That is the difference b/w us & them, no matter what Modi says about us we'll not go beyond certain point as he is PM-RG pic.twitter.com/lzdDgjzNSq
— ANI (@ANI) November 12, 2017
सर्व ट्विट माझे असतात
‘आम्ही जे सत्य आहे, तेच बोलतो आणि गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे, हेच सत्य आहे,’ असे सांगत राहुल यांनी सर्व राजकीय ट्विट हे माझेच असतात असे सांगितले. आमच्याकडे सोशल मिडिया हाताळणारी एक टीम कार्यरत असून मी त्यांनावेळोवेळी सूचना करत असतो अशी माहिती यावेळी दिली.