डॉ. मनमोहनसिंग यांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार; मोहन धारियांविषयी कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:55 PM2017-10-14T23:55:52+5:302017-10-14T23:56:03+5:30

जनतेने पंतप्रधानपद दोनदा माझ्या हाती सोपवले, यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो? मी पुरस्कार टाळतो. मात्र सिध्दांतांशी तडजोड न करता वैचारिक मूल्यांशी एकनिष्ठ असलेल्या मोहन धारियांचे मार्गदर्शन मला लाभले.

Dr. National award for Manmohan Singh; Gratefulness about Mohan Dhariars | डॉ. मनमोहनसिंग यांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार; मोहन धारियांविषयी कृतज्ञता

डॉ. मनमोहनसिंग यांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार; मोहन धारियांविषयी कृतज्ञता

Next

- सुरेश भटेवरा 

नवी दिल्ली : जनतेने पंतप्रधानपद दोनदा माझ्या हाती सोपवले, यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो? मी पुरस्कार टाळतो. मात्र सिध्दांतांशी तडजोड न करता वैचारिक मूल्यांशी एकनिष्ठ असलेल्या मोहन धारियांचे मार्गदर्शन मला लाभले. त्यामुळे त्यांच्या नावाशी संलग्न असा वनराई पुरस्कार स्वीकारण्यात वेगळा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले.
मोहन धारियांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूरच्या वनराई फौंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. सिंग यांना ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, धारिया यांचे सुपुत्र रवींद्र धारिया, वनराई फौंडेशनचे अनंत
धारड आदी यावेळी उपस्थित होते.

कुलदीप नायर म्हणाले, मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपद व विविध भूमिका जबाबदारीने, प्रामाणिकपणे व निष्ठेने बजावल्या. पंतप्रधानपद सोडतांना एक वाक्य त्यांनी सर्वांना ऐकवले, ‘ कोणी करो अथवा ना करो, इतिहास माझ्या कामाचे मूल्यमापन जरूर करील’. विद्यमान काळात साºया देशाला त्यांच्या या वाक्याचे पदोपदी स्मरण होते.

Web Title: Dr. National award for Manmohan Singh; Gratefulness about Mohan Dhariars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.