भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 02:55 AM2024-04-29T02:55:29+5:302024-04-29T02:56:22+5:30

१४ जणांना घेतले ताब्यात

Drugs worth 600 crore seized from Pak boat at sea; Big action by Indian Coast Guard, ATS and NCB | भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई

भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई

अहमदाबाद : अरबी समुद्रात मोठी कारवाई एका पाकिस्तानी बोटीवरून तब्बल ६०० कोटींचे ८६ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात तटरक्षक दलाला मोठे यश केले. या कारवाईत बोटीवरील १४ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये भारतीय तटरक्षक दल, गुजरातचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) सहभागी झाले होते. मागील ३ वर्षांत केलेली ही अकरावी कारवाई आहे.

कारखान्यातून २३० कोटींचा म्याऊ-म्याऊ माल हस्तगत

अहमदाबाद : गुजरात व राजस्थानमध्ये अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करत, तब्बल २३० कोटींचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली.

मनोहरलाल एनानी व  कुलदीपसिंह राजपुरोहित यांनी मेफेड्रॉनचा कारखाना सुरू केल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.

एटीएस व एनसीबी संयुक्त पथकाने कारवाई करत राजस्थानमध्ये सिरोही व जोधपूर तसेच गुजरातमध्ये पिपलाज गाव आणि भक्तीनगर एमआयडीसीतील कारखान्यात  छापेमारी केली. त्यात २२.०८ किलो मेफेड्रॉन आणि १२४ किलो लिक्विड मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. याप्रकरणी राजपुरोहित व एनानी यांना अटक करण्यात आली.

Web Title: Drugs worth 600 crore seized from Pak boat at sea; Big action by Indian Coast Guard, ATS and NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.