दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता- धर्मेंद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 08:17 AM2017-09-19T08:17:56+5:302017-09-19T12:00:52+5:30

दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.

Due to Diwali, petrol and diesel prices are likely to decrease - Dharmendra Pradhan | दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता- धर्मेंद्र प्रधान

दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता- धर्मेंद्र प्रधान

Next
ठळक मुद्देदिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत.पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांवर सर्व स्तरातून टीका होते आहे.

अमृतसर, दि. 19- दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. सर्वसामान्यांबरोबरच विरोधकांकडूनही सरकारवर टीकेचा भडीमार केला जातो आहे.  सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. 

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या महिन्यात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली असून त्यांना कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. युएसमध्ये आलेल्या पुरामुळे तेलाच्या निर्मीतील 13 टक्क्यांनी घट झाली म्हणूनच रिफायनरी तेलाच्या किंमती वाढल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. 

पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. याचवेळी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वर्तवली आहे. इंधनाचे दर जीएसीटी कक्षेत येतील का? असा प्रश्न विचारला असता इंधन दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. असे झाल्यास ग्राहकांना फायदा होईल असंही धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.
३ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

...तर 35 ते 40 रूपयांत मिळेल पेट्रोल, पण मोदी सरकार घेणार का हा मोठा निर्णय?
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा, असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकडे टोलावला आहे. केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला पण पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नाही. गेल्या एका महिन्यातच पेट्रोलच्या किंमत सात रूपयांनी वाढल्या आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर ) रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 70.39 रुपये प्रतिलीटर, कोलकातामध्ये 73.13 रुपये प्रतिलीटर, मुंबईत 79.5 रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये 72.97 प्रतिलीटर इतकी होती. ऑगस्ट 2014 पासूनच्या पेट्रोलच्या या सर्वाधिक किंमती आहेत.  

ऑगस्ट 2014 मध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 70 रुपयांपेक्षा जास्त होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 103.86 डॉलर (जवळपास 6300 रुपये) प्रति बॅरेल होती. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत. गुरूवारची आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत  54.16 डॉलर (3470 रुपये) प्रति बॅरेल होती. त्यामुळे सध्याच्या दरानुसार भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एक लीटर पेट्रोल अवघ्या 21 रूपयांना मिळतं. त्यावर प्रक्रिया करून वापरण्याजोगं बनवण्यात त्याला 10 रूपये खर्च होतो. म्हणजे सरकारने कोणता टॅक्स आकारला नाही, तर 31 रूपयांमध्ये पेट्रोल मिळू शकतं.  पण सध्याच्या करव्यवस्थेत केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारला जातो. राजधानी दिल्लीत 27 टक्के व्हॅट तर मुंबईत 47.64 टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते.
 

Web Title: Due to Diwali, petrol and diesel prices are likely to decrease - Dharmendra Pradhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.