मुसळधार पावसामुळे टॅक्सी वे वर घसरले विमान, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अनर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:47 AM2017-09-06T01:47:29+5:302017-09-06T01:49:06+5:30

कोची विमानतळावर मंगळवारी मोठा विमान अपघात टळला. अबुधाबीहून आलेले एअर इंडियाचे बोर्इंग विमान विमानतळावर उतरल्यानंतर मुसळधार पावसामुळे टॅक्सी वेवरून अचानक विरुद्ध दिशेला फिरले.

Due to heavy rains, the downfall of the taxi voyage, the disaster due to the pilgrimage disaster | मुसळधार पावसामुळे टॅक्सी वे वर घसरले विमान, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अनर्थ

मुसळधार पावसामुळे टॅक्सी वे वर घसरले विमान, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अनर्थ

Next

कोची/मुंबई : कोची विमानतळावर मंगळवारी मोठा विमान अपघात टळला. अबुधाबीहून आलेले एअर इंडियाचे बोर्इंग विमान विमानतळावर उतरल्यानंतर मुसळधार पावसामुळे टॅक्सी वेवरून अचानक विरुद्ध दिशेला फिरले. वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान नियंत्रणात आणल्याने अनर्थ टळला. या विमानात १०२ प्रवासी होते.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सोमवारी रात्री २.४० वाजता बोर्इंग विमान टॅक्सी वे वर घसरले. सर्व १०२ प्रवासी आणि ६ कर्मचारी दारातून बाहेर निघून सामान्य शिडीवरून बाहेर पडले. त्यात कुणीही जखमी झाले नाही. या विमानाची चाके टॅक्सी वेच्या एका बाजूला पावसाचे पाणी बाहेर काढण्याच्या ठिकाणी अडकली. अचानक घसरल्याने विमानाचे पुढचे चाकही (नोज व्हील) तुटले.

Web Title: Due to heavy rains, the downfall of the taxi voyage, the disaster due to the pilgrimage disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.