विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
By admin | Published: July 6, 2016 12:43 AM2016-07-06T00:43:01+5:302016-07-06T00:43:01+5:30
जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
मानधनावर नियुक्ती करा : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ, पंचभाई यांनी दिला आंदोलनाचा इशारा
भंडारा : जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असल्या तरी यात मात्र काही शाळा शिक्षकाविना असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे रिक्त जागेवर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या झालेल्या बदल्यामध्ये जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी यांचे मध्ये सुसुत्रतेचा अभाव कोणताही मागचा पुढचा विचार न केल्याने पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या बदल्या केल्यामुळे काही शिक्षक बदलीच्या ठिकाणी रूजू झाले तर काही शिक्षकाकडून आपल्या मुळच्याच ठिकाणावर आहेत.
काही बदली होवूनही आदेश मिळूनही नवीन ठिकाणी रूजू झाले नाहीत. यात महिला शिक्षकांची फार मोठी समस्या आहे. मुख्य रस्त्यावर असलेले गाव आपल्याला मिळावे यासाठी लाखोंचा घोडाबाजार झाल्याची चर्चा आहे. तशी खुद्द चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
शिक्षकांच्या बदल्या विरोधात शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या. ज्यांना सोयीचे ठिकाण मिळाले ते तत्काळ रूजू झाले. जे बाजाराचे मुल्य देवूनही योग्य ठिकाण न मिळाल्यामुळे जागेवर स्थिर आहेत.
या घोळात काही शाळांत अधिक तर काही शाळात एकही नाही. महलिा शिक्षकांना बऱ्याच लांबून ये-जा करावा लागत असल्याने वर्षभरात येण्या-जाण्याचा खर्चाचा हिशोब करून लाखो रूपये मोजायला तयार शिक्षक तयार असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत अगोदरच विद्यार्थी संख्या कमी असल्याने बऱ्याच शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही शाळा अखेरची घटका मोजत आहेत. या बदल्यासंदर्भात केव्हा विचार करतील व चिमुकल्या मुलांना केव्हा शिक्षक मिळतील?, शिक्षक मिळणार की नाही हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यांना शिक्षक मिळाले नाही तरी गरीबांच्या मुलांची खासगी शाळेत शिकण्याची ऐपत नसल्याने ‘शिकवा की नका शिकवू आम्ही जिल्हा परिषद शाळेतच जाणार’ असे बोलके चित्र पवनी तालुक्यात पहावयास मिळत आहे.
पवनी तालुक्यातील निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे तुनतुने वाजवणारे पुढारी शाळेसाठी आवाज का काढत नाही, असा प्रश्न जनता करीत आहे.
सदर प्रकरणा संदर्भात पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला भेट देवून शहानिशा केली. यात बरीच पदे रिक्त असल्याचे लक्षात आले. यामध्ये केंद्र प्रमुखाची दोन पदे, शिक्षक विस्तार अधिकारी दोन पदे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पाच पदे, पदवीधर शिक्षक, विस्तार अधिकारी दोन पदे, पदवीधर शिक्षक १५, सहायक शिक्षक १४, वरिष्ठ सहायक एक व परिचर एक अशी पदे रिक्त आहेत. यावर तोडगा काढावा, अशी मागणी तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)