भारत-नेपाळमध्ये आठ करार, दोन्ही देशांचे संबंध हिमालयाइतके जुने - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 10:32 PM2017-08-24T22:32:47+5:302017-08-24T22:45:22+5:30

भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करार झाले आहेत. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. 

 Eight agreements in Indo-Nepal, the relationship between the two countries is as old as the Himalayas - Modi | भारत-नेपाळमध्ये आठ करार, दोन्ही देशांचे संबंध हिमालयाइतके जुने - मोदी

भारत-नेपाळमध्ये आठ करार, दोन्ही देशांचे संबंध हिमालयाइतके जुने - मोदी

Next

नवी दिल्ली, दि. 24 - नेपाळचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. उभय देशामध्ये आज बांधकाम क्षेत्र तसेच शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करार झाले आहेत. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत.  या करारांवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशाच्या संबधावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, नेपाळ आणि भारताचे संबंध नेहमीच दृढ राहतील. दोन्ही देशांचे संबंध हिमालयाइतके जुने असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

दरवर्षी पुरामुळे नेपाळला होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुरामुळे सध्या नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबद्दल भारताकडून आवश्यक ती सर्व मदत नेपाळला दिली जाईल, असे आश्वासन यावेळी पंतप्रधान यांनी शेर बहादूर देऊबा यांना दिले. नेपाळचे संविधान सर्व समाज घटकांचा विचार करुन तयार केले जाईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने भारताचे प्रयत्न सुरु आहेत. नेपाळच्या विकासात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे मोदींनी म्हटले. यावेळी त्यांनी भारताकडून दिल्या जात असलेल्या विजेचादेखील उल्लेख केला. भारताकडून नेपाळला केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात वाढ केली जाणार असल्याची माहिती मोदींनी यावेळी बोलताना दिली.

दोन्ही देशांमध्ये हे झाले आहेत करार -
50 हजार घरकुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य भारताच्या वतीने पुरविण्यासंबंधी करार
भूकंपामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळमधील शिक्षण संस्थांची नव्याने उभारणी करण्यासाठी मदतीचा करार
नेपाळचा सांस्‍कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुरातन वास्तूंच्या बांधकामाला सहाय्य
भूकंपामुळे नेपाळमधल्या आरोग्य क्षेत्राची झालेली हानी भरून काढण्यासाठी वैद्यकीय संस्थांची उभारणी करण्यासाठी सहाय्य
मेची सेतु आणि उभय देशांतील रस्ते वाहतूक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या मदतीचा करार
अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचा करार
मूल्यांकनामध्ये समानता आणण्यासाठी प्रमाणिकरण क्षेत्रात सहकार्य करण्याचा करार
भारत आणि नेपाळमधील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् यांच्यामध्ये सामंजस्य करार

Web Title:  Eight agreements in Indo-Nepal, the relationship between the two countries is as old as the Himalayas - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.