गुजरात निवडणुकीचं बिगूल वाजलं; 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान तर 18 डिसेंबरला गुजरात, हिमाचलप्रदेशचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 01:05 PM2017-10-25T13:05:56+5:302017-10-25T15:22:51+5:30

बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे.

Election Commission's press conference begins, announcement of dates of Gujarat elections | गुजरात निवडणुकीचं बिगूल वाजलं; 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान तर 18 डिसेंबरला गुजरात, हिमाचलप्रदेशचा निकाल

गुजरात निवडणुकीचं बिगूल वाजलं; 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान तर 18 डिसेंबरला गुजरात, हिमाचलप्रदेशचा निकाल

googlenewsNext

नवी दिल्ली - बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबर तर दुस-या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होईल. 18 डिसेंबरला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी तर, दुस-या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 93 जागांसाठी मतदान होईल. 

गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून  मतदानासाठी 50,128 मतदान केंद्रे उभारण्यात येतील. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना पहिले प्राधान्य मिळेल असे निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांनी सांगितले. गुजरातमध्ये आदर्श अंचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार तसेच उमेदवाराची सर्व माहिती सुद्धा दाखवली जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले. 

गुप्तता राखण्यासाठी मतदानाच्या जागेची उंची वाढवणार येणार असून,  ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध असतील. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल.  कुठलाही उमेदवार 28 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करता येणार नाही. निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल असे अचलकुमार जोती यांनी सांगितले. पेड न्यूजच्या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. 102 मतदान केंद्रांवर महिला नियुक्त केल्या जातील. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 69 जागांसाठी नऊ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, त्याचा निकालही 18 डिसेंबरला लागेल. 

-  गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार - निवडणूक आयोगाची माहिती. 

- मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना मिळणार प्राधान्य - निवडणूक आयोग. 

- मतदानासाठी 50,128 मतदान केंद्रे उभारणार - निवडणूक आयोग. 

- गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान.

- मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करणार.

- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर. 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला होणार मतदान

- मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार, उमेदवाराची सर्व माहिती दाखवणार.

- गुप्तता राखण्यासाठी मतदानाच्या जागेची उंची वाढवणार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध असेल. 

- संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील.

- कुठलाही उमेदवार 28 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करु शकत नाही.

- निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल.

- पेड न्यूजच्या प्रकारावर यंत्रणेचे लक्ष असेल - निवडणूक आयोग.

- मोबाइल अॅपच्या माध्यमातून लोक निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करु शकतात तसेच फोटोही पाठवू शकतात - निवडणूक आयोग.

- 102 मतदान केंद्रांवर महिला नियुक्त केल्या जातील.

- 18 डिसेंबरला  दोन्ही टप्प्यातील गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होईल.

- पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 19  जिल्ह्यांमध्ये होणार मतदान.

- दुसऱ्या टप्प्यात 83 जागांसाठी 14 जिल्ह्यांमध्ये होणार मतदान.

Web Title: Election Commission's press conference begins, announcement of dates of Gujarat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.